लोक विद्यालय नेरी ची शालांत परीक्षेत उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम

34

नेरी : नुकताच शालांत परीक्षेचा निकाल लागला असून दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी लोक विद्यालय नेरीचा निकाल 96.82 टक्के लागला असून प्राविण्य श्रेणी मध्ये 09 प्रथम श्रेणी मध्ये 25 द्वितीय श्रेणी मध्ये 21 तर तृतीय श्रेणीत 6 अश्या सर्वच विद्यार्थ्यांनी यश प्राप्त करीत उज्वल यशाची उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम ठेवली आहे यात कु योगेश्वरी पाडुरंग ढोले 87.60टक्के घेत प्रथम क्रमांक पटकावला तर क्षितिजा आनंदराव टेंभुरणे 85 टक्के घेत द्वितीय तर आदित्य किशोर डांगे 83 .40 टक्के घेत तृतीय क्रमांक पटकावला असून विद्यालयाचे नाव उज्वल केले आहे.

.        लोक विद्यालयात यावर्षी 63 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 61विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळे शाळेचा निकाल 96.82 टक्के लागला असून उज्वल यशाची परंपरा कायम आहे उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने प्राचार्य तथा मुख्याध्यापक इ का रदये, संजय मेश्राम,प्रकाश न्हाने, संदीप चौधरी, मोरेश्वर वासेकर, सुरेश पिसे, निळकंठ पिसे,निलेश बोरसरे, सुरेखा पडोळे,साधना दडमल, ढोले ज्योती पिसे, यांनी अभिनंदन केले तसेच युग प्रवर्तक सेवा मंडळ शिक्षण संस्थेच्या सर्व संचालक मंडळाने सुद्धा अभिनंदन केले आहे या उज्वल कामगिरी करणाऱ्या विध्यार्थ्यांचे शालेय शिक्षकांचे आणि शाळेचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.