बारावीत कमी टक्के मिळाले म्हणून विद्यार्थ्यांची आत्महत्या

70

नेरी येथील घटना

नेरी : दि 21 संपुर्ण राज्यात 12 वी चे निकाल जाहीर झाले सर्वच विद्यार्थी निकाल पाहून यश प्राप्त केल्यानंतर हर्षोउलास करीत आनंद साजरा करीत असताना नेरी येथे दुःखद दुर्दैवी घटना घडली नेरीतील एका विद्यार्थ्यांने बारावीत कमी गुण मिळाले आणि टक्केवारी कमी झाली याचा धसका घेऊन नैराश्यात येऊन घरी कोणीही नसताना दार बंद करून गळफास लावून जीवनयात्रा संपविली.

.       नेरी येथील आकाश पुरुषोत्तम वैरागडे असे गळफास लावणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव असून तो चिमूर येथील नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होता. बारावीची परीक्षा झाली आणि पेपरसुद्धा चांगले गेले असल्याने परीक्षेत यश संपादन करिन असा त्याचा आत्मविश्वास होता. मात्र निकाल लागताच नेट करून निकाल तपासताच त्याला धक्का बसला. मेहनत करून ही एकदम कमी गुण मिळून टक्केवारी कमी आल्याने आपले जीवनात काहीच होणार नसल्याने तो नैराश्यात आला काय करावे त्याला कळले नाही. मेहनत करून यश प्राप्त झाले नाही. याची खंत त्याच्या मनात सलत होते आणि त्याला ही खंत शांत राहू देत नव्हती त्यामुळे त्याने जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला व आज घरात कोणीही नसताना दरवाजा बंद करून दोराच्या साह्ययाने अंदाजे 2 वाजताच्या सुमारास गळफास घेऊन जीवन संपविले अशी चर्चा असून या घटनेने नेरीत एकच खळबळ उडाली. त्यामुळे नेरीत हळहळ व्यक्त होऊ शोककळा पसरली.

.       सदर घटनेची माहिती बाहेरून सायंकाळी अंदाजे 6 वाजता दरम्यान घरी परत आलेल्या भावाला कळली. घरी येताच दरवाजा आतून बंद असल्याचे कळताच अनेकदा आवाज देऊनही कोणीही प्रतिसाद न दिल्याने दरवाजा तोडण्यात आल्यावर भावाला धक्का बसला समोर आकाश चे प्रेत लटकताना दिसले. यानंतर आई वडील घरी पोहचले सदर वार्ता पसरताच आकाशला बघण्यासाठी एकच गर्दी घरासमोर उसळली सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून वृत्तलीही पर्यंत पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते व पुढील कारवाई सुरू होती.