तोडलेल्या सागाच्या खुटेवर टाकल्या जात आहे रिनंबरचा शिक्का

34

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचा गुन्हा लपविण्यासाठी आटापीटा !

विहीरगाव 2 अवैध सागवान वृक्ष तोड प्रकरण

नेरी : पळसगाव वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या मदनापूर उपक्षेत्रातील नियतक्षेत्र विहीरगाव क्र २ मध्ये मिश्र रोपवणातील मौलवान सागवानाची सागतस्करा कडून खुलेआम तोड करण्यात आली होती, दिनांक 7 मे ला प्रकरण उघडकीस आल्यानंतर वनाधिकारी यांनी 8 मे ला वरिष्ठ अधिकारी यांना असा प्रकार घडल्या नसल्याचे कळविळे होते. मात्र स्थानिक नागरिकांच्या मार्फतीने प्रसार माध्यम प्रतिनिधीनी प्रकरण उचलून धरल्यामुळे दिनांक 11 मे ला त्या तोडलेल्या साग खुटावर पि आर फाडून नंबर टाकल्या जात असल्याचे सूत्रांची माहिती आहे.

.       दि. १३ मे ला सदर प्रकरणाची चौकशी केली असता अजूनही त्याचा अहवाल प्राप्त झाला नसल्याने वरिष्ठ वनाधिकारी स्थानीक वनाधिकारी व वनपाल यांना शाबसकीची पाठ थोपटल्या जात आहे कि काय असे ही चर्चेला जातं आहे. चालत असलेला अवैध वृक्ष तोड गोरखप्रकार उजेडात आणल्यामुळे वनविभागात चांगलीच खळबळ उडाली आहे.

.       सदर घडलेला प्रकार वरिष्ठ वनाधिकारी यांच्या नजरेस येऊ नये म्हणून वनकर्मचारी यांनी मजुराच्या हस्ते तोडलेल्या काही साग झाडाच्या खुटे सुद्धा माती व पालापाचोळा टाकून लपविण्याचा स्थानिक वनविभागाचा प्रयत्न केला गेला आहे. तसेच जुना असलेल्या खुटावर या पूर्वी नंबर टाकल्या गेले नसताना चोरी लपविण्यासाठी आता नंबर टाकल्या जातं असून नवीन खुटवर मातीत लेव्हल पर्यंत तोड करून जमिनीत दाबल्या जातं असल्याची माहिती आहे. अवैध साग तोड प्रकरणात स्थानीक वनपरीक्षेत्र अधिकारी, व वनपाल यांच्या कार्यशैली वर प्रश्नचिन्ह निर्माण होत.असून मागील दोन वर्षांपासून त्या ठिकाणाची अवैध तोड होत असताना त्या बीटातील वनपाल, वनाधिकारी यांनी बिट इन्फेकशन करण्याची आदेश असताना वणाधिकारी यांनी मात्र इन्फेकशन केले नाही किं घरी बसून इन्फेकशन करण्यात आला याची शोध घेने गरजेचे झाले आहे.

.       सोन्याच्या किंमतीने विकल्या जाणाऱ्या सागवानाची अवैध तोड झाली आहे. असल्या वनाधिकारी आणि वनकर्मचारी यांच्या गलथाण कारभारामुळे चोरीचे प्रमाण वाढले आहे. वरिष्ठ अधिकारी यांना चौकशी बद्दल विचारले असता चौकशी चालू असल्याची माहिती मिळली आहे. अहवाल सादर केल्यानंतर कोणती कार्यवाही वनविभाग करेल याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे.

उपसंचालक यांच्या कार्यप्रणाली वर प्रश्न चिन्ह ?                                                                                                                                                                                                                                          तत्कालीन दबंग उपसंचालक गुरुप्रसाद यांच्या कार्यकाळात सर्व वनपरीक्षेत्रातील वनपरीक्षेत्र अधिकारी पासून तर वनकर्मचारी मुख्यालयी राहून कार्य पार पाडत होते.आता मात्र सर्व मोकाट सोडून शहरात राहणे सुरु केल्याने ताडोबाचे नैसर्गिक वने नष्ट करून जंगल पोकरण्याचा प्रकार सुरू असल्याचे दिवसेंदिवस दिसत आहे. मात्र उपसंचालक यांचे या कडे दुर्लक्ष होत असल्याने दिवसेंदिवस वृक्षतोडीचा प्रकार वाढल्या जाणार आहे.