भाजपाचा नारा चारसौ पार, पण ‘ राम भरोसे ‘!

44
  • चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार तिसऱ्यांदा उमेदवार
  • १९८९ व १९९१च्या लोकसभा निवडणुकीत झाला होता पराभव

अनेकश्वर मेश्राम
    विसापूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल काही दिवसात वाजण्याची वेळ आली आहे. केंद्रातील सत्तेत असलेल्या भाजपाने लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची घोषणा करून आघाडी घेतली आहे. काल बुधवारी दुसरी यादी जाहीर केली.यामध्ये महाराष्ट्र राज्यातील २0 लोकसभा क्षेत्रासह चंद्रपूर क्षेत्रातून राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. ते तिसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणुकीला समोरे जात आहे. त्यांचा यापूर्वी १९८९ व १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. आता तिसऱ्यावेळी मतदार त्यांच्या लोकसभा निवडणुकीत काय निर्णय घेतात, याकडे राजकीय धुरिणाचे लक्ष लागले आहे. तसाही यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने चारसौ पार चा नारा दिला, पण ‘ राम भरोसे ‘ असी चर्चा मतदारात केली जात आहे.

.      भाजपाने प्रत्येक वेळी लोकसभा निवडणूक दरम्यान हिंदुत्व व राम मंदिर मुद्दा पुढे करून मतदारांना आपल्याकडे आकृष्ट केले. आजही त्यांचे राजकारण यापुढे जात नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार अयोध्या येथे मोठ्या थाटात रामललाची प्रतिष्ठापना नुकतीच झाली. धर्माधिष्टीत संस्कृतीचे गोडवे गात भाजपाने राजकारणाचा पाया मजबूत केला.आजही ते यापासून फारकत घेण्याच्या मानसिकतेत नाही.म्हणूनच यावर्षीचा भाजपचा नारा चारसौ पार, पण ‘ राम भरोसे ‘! आहे.याला सर्व संस्थांचे पाठबळ आहे. २0१९ च्या लोकसभा निवडणुकीत आश्चर्यकारक माजि केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर यांचा शिवसेनेतून काँग्रेसमध्ये दाखल झालेले बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या कडून मात खावी लागली.मात्र त्यांना अकाली निधनामुळे कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.

.      राज्याचे वने,सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवारांना राज्याच्या राजकारणात रस असल्याचे जाणवत होते.मात्र त्यांच्या कार्यशैली मुळे झेप उंच असल्याचे दिसून येत होते.याची चाहूल त्यांना वर्षभरापूर्वी लागली होती.अखेर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शहा व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नढा व केंद्रीय निवडणूक समितीने चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात त्यांना उतरविले आहे.सुधीर मुनगंटीवारांनी यापूर्वी १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा नशीब आजमावले होते. मात्र काँग्रेसचे उमेदवार शांताराम पोटदुखे यांचेकडून त्यांना पराभूत व्हावे लागले होते. तेव्हा चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकूण १६ उमेदवार होते.त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार शांताराम पोटदुखे यांना २ लाख ४3 हजार ८५४ मते तर भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना दुसऱ्या क्रमांकाचे १ लाख ९3 हजार 3९७ मते मिळाली होते. ही टक्केवारी अनुक्रमे ४0.१3 व 3१.८२ असी होती. १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा त्यांनी दुसऱ्यांदा भाजपाच्या तिकिटावर लढत दिली. मात्र यावेळीच्या लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत झाली. यामध्ये सुधीर मुनगंटीवारांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शांताराम पोटदुखे यांना २ लाख १२ हजार ९४८ मते, जनता दलाचे उमेदवार मोरेश्वर टेम्भूर्डे यांना १ लाख २५ हजार २५१ मते तर भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना १ लाख २3 हजार १२२ मते मिळाली होती. यावेळीच्या निवडणुकीत देखील १६ उमेदवारांनी दंड थोपटले होते.

.      आता यावर्षीच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून तिसऱ्यांदा सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून निवडणुकीला समोरे जाणार आहे. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, चंद्रपूर, बल्लारपूर व राजुरा विधानसभा तर यवतमाळ जिल्ह्यातील वणी व आर्णी विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. काँग्रेसची उमेदवारी अद्याप जाहीर झाली नाही. तरीही चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात निवडणूक गाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्याखेपेला मतदार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर विश्वास व्यक्त करणार काय, हे आताच स्पष्ट होणार नाही. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे घोडा मैदान जवळ आले आहे.