विठाई बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने डेबू सावली वृद्धाश्रम येथे जागतिक महिला दिन साजरा

40

चंद्रपूर : जागतिक महिला दिनी दरवर्षी संस्थेद्वारे वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केल्या जात असते. हा दिवस जागतिक स्तरावर महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी केला जातो. तसेच लिंग समानतेचे महत्व पटवून देण्याकरिता देखील हा दिवस साजरा केला जातो. हाच उद्देश समोर ठेवून डेबू सावली वृद्धाश्रम येथे जागतिक महिला दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला संस्थेचे अध्यक्ष महेश काहीलकर डेबु सावली वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सुभाष शिंदे सहसचिव भारती शिंदे विठाई बहुउद्देशीय संस्थेचे कोषाध्यक्ष दिनेश जुमडे संस्थेच्या सदस्य कमल अलोने यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पुष्प माला अर्पण करण्यात आले.

.      महिला दिनाचे औचित्य साधत अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करत महिला दिनाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. सुभाष शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून अतिशय मार्मिक उदाहरणाद्वारे अमूल्य असे मार्गदर्शन केले. विठाई बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष महेश काहीलकर यांनी सुद्धा संस्थेच्या कार्याची माहिती देत महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन कीर्ती नगराळे यांनी केले तर आभार वृद्धाश्रमातील आजी सुधा मुळे यांनी केले.

.      सोबतच महाशिवरात्रीची औचित्य साधत अर्चना मिसार आणि त्यांच्या समूहाने भजनाचे सादरीकरण केले. वृद्धाश्रमातील आजी-आजोबांनी यात सहभाग दर्शवत वातावरण भक्तीमय केले. सुधा आजी कडून स्वरचित कवितेचे सुद्धा वाचन करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्यातील कलागुण अगदीच कौतुकास्पद होते. एकंदरीत आनंददायी, भक्तीमय वातावरणात महिला दिनाचा कार्यक्रम पार पडला. विठाई बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने स्नेहभोजनाची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली होती.

.      कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यात प्रामुख्याने महेश काहीलकर, चेतन जनबंधू, दिनेश जुमडे, कीर्ती नगराळे, माधुरी काहीलकर, भारती जिराफे, शिवानी घटे, सीमा टेकाळे, मीनाक्षी अलोणे, अमृता वाडेकर, अर्चना बारापात्रे, अर्चना मिसार, अश्विनी भाकरे, पौर्णिमा बलकी, सविता कुचनकर, कमल आलोने, प्रतिभा नागलकर, शालू कथळे, श्रुती आलोने इत्यादींचे सहकार्य लाभले.