भरारी महिला ग्राम संस्थेच्या वतीने महिलांसाठी सकस आहार स्पर्धा 

34

कुचना : महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय चंद्रपूर अंतर्गत समन्वय लोकसंचालीत साधन केंद्र भद्रावती नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प  संचालित भरारी महिला ग्रामसस्था (माविम) च्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.

.     या कार्यक्रमाच्या अंतर्गत महिला सक्षमीकरण व सामाजिक समानता  घटका अंतर्गत नूर्टीशन व तिरंगा थाळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. तसेच ग्रामीण आरोग्य केंद्र भद्रावती चे भडके व त्यांची टीम यांच्या सहकार्याने एचबी कॅम्प व आरोग्य तपासणी करण्यात आली. एमआरसीपी 1998 पासून निरंतर चालू असणारे व त्यांना माविम व सीएमआरसी ची संकल्पना स्पस्ट असणाऱ्या गटांना श्रीफळ देऊन गावस्तारावर सत्कार करण्यात आले.

.     कार्यक्रमाचे अध्यक्षा सरपंच सुचिता ताजने तर उद्घाटक सरपंच योगिता बंड पोलिस पाटील हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक समन्वय लोकसंचालीत साधन केंद्र भद्रावतीच्या व्यवस्थापक  दक्षिणा हुमणे, सामाजिक कार्यकर्ते योगिता लाडगे उपस्थित होते. सदर महिलांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्याकरीता माजरी पोलिस स्टेशन च्या प्रतिनिधी भारती उंदिरवाडे, केंद्राच्या कोषाध्यक्षा ज्योती लांडगे व कुचना ग्रामपंचायत महिला कार्यकारणी उपस्थित होते. तसेच तिरंगा थाळी स्पर्धेत थोरांना, मानगावं, राळेगाव, पाटाला, माजरी कावडी पळसगावं येथील माविम स्थापित गट उपस्थित होते. महिलांचे आरोग्य व सकस आहाराचे महत्व यावर सविस्तर मार्गदर्शन करून तिरंगा थाळीला प्रथम, दुसरा आणि तिसरा क्रमाक देऊन बक्षीस घोषित करण्यात आले.

.     जागतिक दिनाचे औचित्य साधून बचतगट महिलांनी थोर समाजसुधारक महिलांच्या भूमिकेत जाऊन त्यांची वेशभूषा व त्यांनी केलेले कार्य यावर प्रकाशझोत टाकली व त्यांचा वारसा पुढे आम्ही चालवू असे महिलांसमोर दाखवून दिले.

.     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुचना गाव प्रतीनिधी तथा समन्वय लोकसंचालीत साधन केंद्र भद्रावतीच्या अध्यक्षा आशा प्रफुल ताजने यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन मनीषा गणेश वैद्य व आभार प्रदर्शन क्षेत्रीय  समन्वयक शालिनी रायपुरे यांनी केले.  सदर कार्यक्रमा यशस्विते करिता कुचना व कावडी गावातील सर्व माविम बचतगटाने सहकार्य केले.