वासेरा येथे मजगी पुनर्जीवन अंतर्गत बांधावर मातीकामाचा शुभारंभ

34

सिंदेवाही : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक अंतर्गत पाणलोट विकास समिती मार्फत वासेरा येथे मजगी पुनर्जीवन चे मातीकाम करून शेतकऱ्यांचे बांधावर माती भरण्याचे काम मंजूर असून नुकतेच पाणलोट समितीचे अध्यक्ष तथा सरपंच महेश बोरकर यांचे हस्ते विधिवत भूमिपूजन करून काम सुरू करण्यात आले.

.        तालुका कृषी अधिकारी कार्यालय सिंदेवाही अंतर्गत मौजा वासेरा येथे अंदाजे १४० ते १५० हेक्टर क्षेत्रातील शेतीवरील बांधावर माती भरण्याचे काम कामाचे अंदाज पत्रक तयार करण्यात आले. त्या कामांना प्रशासकीय मंजुरी प्राप्त होताच पाणलोट विकास समितीच्या मार्फतीने कामांना प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली. पाणलोट समितीचे अध्यक्ष तथा सरपंच महेश बोरकर यांचे हस्ते विधिवत पूजा करून भूमिपूजन करण्यात आले.

.        यावेळी कृषी पर्यवेक्षक बारापात्रे, कृषी सहाय्यक प्रतीक भोयर, समितीचे सचिव दिलीप कापकर, सदस्य महेंद्र कोवले, गिरीश धात्रक, विष्णू बोरकर, हेमंत मस्के, तसेच शेतकरी मंगलदास अलाम, यांचे सह अनेक शेतकरी उपस्थित होते. गावात मजगी पुनर्जीवन अंतर्गत शेतातील धुरे (बांध) भरण्याचे काम आले असल्याने अनेक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.