विसापूरचे बटनिकल उद्यान निसर्ग पर्यटनाला चालना देणार

62
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास
  • मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १६२२ कोटीच्या कामाचा सुभारंभ

विसापूर : चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर येथील बॉटनिकल गार्डन राज्याच्या वैभवात भर टाकणारे आहे. जागतिक पातळीवर संशोधकांना संधी उपलब्ध करून देणारे आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पा नंतर पर्यटक निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी बॉटनिकल गार्डनला भेट देतील. यामुळेच विसापूर येथील बाटनिकल गार्डन निसर्ग पर्यटनाला चालना देणारे ठरणार आहे, असा आशावाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रदेय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी बाटनिकल गार्डन विसापूर येथील लोकार्पण कार्यक्रमात केला.

.       चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल १६२२ कोटी रुपये खर्चाच्या विकास कामाचा सुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवार दि. १२ मार्च रोजी बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील एस. एन. डी. टी. महिला महाविद्यालयाच्या नियोजित प्रांगणात करण्यात आला. यावेळी त्यांनी कळ दाबून श्रदेय अटल बिहारी वाजपेयी बाटनिकल गार्डनचे लोकार्पण, एस. एन. डी. टी. महिला महाविद्यालय, उपकेंद्र विद्यापीठाचे भूमिपूजन, चंद्रपूर महानगरपालिका पाणी पुरवठा व मलनिस्सारन प्रकल्पवार खर्च होणाऱ्या १६२२.८२ कोटी रुपये विकास कामाचा सुभारंभ केला. यावेळी ते बोलत होते.

.       मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात माता महाकालीच्या चरणी नतमस्तक होऊन करत असल्याचे म्हणत, ते म्हणाले राज्य सरकार सर्वसामान्यांच्या हितासाठी आहे. आपल्या भागात सोन्यासारखा चकाकणारा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार नेता आहे. कोणतेही काम नेटाने पुढे नेत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयामुळे राज्य चौफर प्रगती करत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्याच्या प्रगतीसाठी मोलाचे सहकार्य मिळत आहे. हे सर्व राज्यातील जनतेच्या प्रेमाचे प्रतिक आहे. ज्या प्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाल कुटुंब मानतात. त्या प्रमाणे आम्ही देखील राज्याला कुटुंब समजतो. म्हणूनच जनता म्हणते, ‘फिर एक बार, फिरसे मोदी सरकार’, याची प्रचिती आगामी लोकसभा निवडणुकीत येणार आहे. मी राज्याचा मुख्यमंत्री असलो तरी, मी काल ही बाळासाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता होतो, आजही आहे. सी.एम. म्हणजे मी सामान्य माणूस आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी भावनिक साद घातली.

.       यावेळी व्यासपीठावर राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबईच्या नाथीबाई दामोदर ठाकरशी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा.उज्वला चक्रदेव, गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, राज्य वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वणसंरक्षक शैलेश टेम्भूर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, जिहलाधिकारी विनय गौडा जी. सी., जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जानसान,जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन,प्रा.रुबी ओझा, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक डा. जितेंद्र रामगावकर, चंद्रपूर मनपा आयुक्त विपीन पालीवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेशकुमार टांगले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे बाटनिकल गार्डनची प्रतिकृती प्रदान करून मान्यवरांनी स्वागत केले.प्रास्ताविक जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी केले.

आगामी तीन महिने सर्वांसाठी बाटनिकल खुले राहणार : पालकमंत्री मुनगंटीवार                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                           श्रदेय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी बाटनिकल गार्डन विद्यार्थ्यांना नवे दालन खुले करणारे आहे. आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे हे उद्यान होणार आहे. अलीकडेच आपण ताडोबा उत्सव साजरा केला. याची सर्वांनी प्रसंशा केली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याचे ढान्या वाघ आहेत. ते ताडोबाच्या वाघाच्या भेटीला आपल्या प्रेमामुळे आले. त्यांच्या नेतृत्वात राज्य चौफेर विकास करत आहे. यामुळे राज्याची वाटचाल प्रगतीकडे आहे. मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो, औद्योगिक प्रकल्पाच्या कक्षा विस्तारण्यासाठी मदत करा. यामुळे आगामी दहा वर्षात जिल्ह्यातील बेरोजगारी कमी होईल. ताडोबातील पर्यटन महिलांना मोफत करण्यात येणार असून आगामी तीन महिन्यासाठी विसापूरचे बाटनिकल गार्डन सर्वांसाठी खुले राहणार आहे, असे आश्वासन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी आपल्या भाषणातून दिले.