माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात नुतन नेहरू विद्यालय तालुक्यातुन द्वितिय

43

वरोरा : माझी शाळा, सुंदर शाळा या अभिनयानात वरोरा तालुक्यातील नागरी शिक्षण संस्था नागरी द्वारा संचालीत नूतन नेहरू विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नागरी ही शाळा ग्रामिण मागातून द्वितीय आली आहे.

.       १ जानेवारी ते १५ फरवरी २०२४ या कालावधीत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात तालुक्यातील सर्व शाळांनी सहभाग घेतला केंद्रस्तरावर नंतर तालुकास्तरावर या शाळांची तपासणी करून मूल्यांकन करण्यात आले .त्यात नूतन नेहरू नागरी विद्यालयाने द्वितिय क्रमांक पटकाव‌ला आहे. सदरअभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात आले होते हे विशेष.

.       विद्यार्थी, शिक्षक, पालक, तसेच माजी विद्यार्थी यांच्या मनात शाळेविषयी उत्तरदायीत्वाची भावना निर्मिन व्हावी व त्यातून प्रेरणादायी वातावरणाची निर्मिती व्हावी यासाठी हे अभियान राबविण्यात आले होते. या अभियानात तालुक्यापुन ४१ माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला होता.

.       शाळेच्या मुख्याध्यापक तथा प्राचाया भारती घोडमारे व सर्व शिक्षक, शिक्षीका तसेच शिक्षकेतर कर्मचारी , सर्व विध्यार्थी यांचे‌ संस्थेचे अध्यक्ष दिलीप टिपले, उपाध्यक्ष सुभाष त्रिवेदी, साचिव डॉ. आशिष टिपले तसेच सर्व संचालकांनी केले आहे. शाळेचे हे यश विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.