बापरे ! गाडी एकाची आणि दंड दुसऱ्यालाच

39

 महामार्ग पोलिसांचा अजब गजब कारभार 

सिंदेवाही : वाहतुकीचे नियम तोडणे, हेल्मेट न लावणे, मद्य प्राशन करून वाहन चालविणे, यासारख्या अनेक बाबींसाठी वाहतूक पोलीस बारीक सारीक लक्ष घालून शहराच्या बाहेर उभे असतात. आणि दूचाकी, चारचाकी, वाहनांना थांबवून काहीतरी कारणे शोधून त्या वाहन चालकावर दंड आकारण्याची भीती दाखवत असतात. मात्र नुकताच
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही – तळोधी या रोडवरील चिखलगाव फाट्यावर वाहतूक पोलिसांनी एका होंडा शाहीन गाडी वाल्यांना चालत्या गाडीवरून मोबाईल मध्ये नंबर स्कॅन करून दंडाची पावती काढताना ती पावती चक्क दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाने आली असल्याने अन्यायग्रस्त व्यक्ती वाहतूक पोलिसांच्या बाबतीत चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

.        चिखलगाव या बसस्थानकावर वाहतूक पोलीस थांबून असताना एक होंडा शाहीन गाडीवर तीन व्यक्ती बसुन जात होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र ते वाहन धारक थांबले नसल्याने पोलिसांनी धावत्या गाडीचा नंबर मोबाईल मध्ये स्कॅन केला. मात्र नंबर स्कॅन करताना एक नंबर चुकीचा स्कॅन झाला. आणि मोबाईल मशीन मध्ये अन्य दुसऱ्याच व्यक्तीचा गाडी नंबर सेव झाला. आणि त्याच्या दंडाची ऑनलाईन पावती सिंदेवाही – लोनवाही येथील ॲक्टिव्हा गाडी असलेल्या महिलेला जावून त्यांच्या मोबाईल वर ५०० रुपयाचा दंड भरण्याचा संदेश गेल्याने सदर महिला चांगलीच धास्तावलेली आहे.

.        आजकाल वाहतूक पोलिसांचे काम सोपे व्हावे म्हणून अनेक तांत्रिक पद्धतीने वाहतूक पोलीस दंड आकारात असले तरी त्याचा फटका सामान्य व सज्जन व्यक्तींना बसत आहे. वाहतूक पोलिसांचे काम असेच सुरू राहिले तर त्याचा भुर्दंड सामान्य नागरिकांना सोसावा लागणार आहे. मोबाईल मशीन मध्ये गाडीचा नंबर स्कॅन करताना एक नंबर चुकल्याने एका व्यक्तीच्या दंडाची ऑनलाईन पावती चक्क दुसऱ्याच व्यक्तीच्या मोबाईल वर गेली आहे. त्यामुळे भविष्यात असे प्रकार घडू नयेत याकरिता चंद्रपूर येथील वरिष्ठ वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी या बेजबाबदार कामाकडे लक्ष घालून कामामध्ये पारदर्शकता निर्माण करावी. आणि वाहतूक पोलिसांबद्दल नागरिकांच्या मनात असलेला गैरसमज दूर करावा. तसेच दोषी असलेल्या वर कारवाही करावी. अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.