सेवानिवृत्त शिक्षकांसाठी शासनाकडून भरघोस अनुदान प्राप्त

51

  स्वतंत्र समता शिक्षक संघाच्या प्रयत्नाला यश  

सिंदेवाही : मागील अनेक दिवसापासून सेवानिवृत्त शिक्षकांचे नियमित पेन्शन रखडले असल्याने सेवानिवृत्त शिक्षक अडचणीत आले होते. त्यामुळे स्वतंत्र समता शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष सुनील तेलतुंबडे व जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष देवांश उराडे यांचे अथक प्रयत्नाने अखेर सेवानिवृत्त शिक्षकांना भरघोस अनुदान प्राप्त झाले कार्यरत शिक्षकांचे अनेक देयकांचे अनुदान प्राप्त झाले असल्याने लवकरच शिक्षकांना त्याचा लाभ मिळणार असल्याची माहिती स्वतंत्र समता शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष राजेंद्र गेडाम यांनी प्रसिध्दी माध्यमांना दिली आहे.

.      राज्य शासनाने सेवानिवृत्त शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाच्या २ ते ४ हप्ते, थकीत वेतन, नियमित व सेवानिवृत्त शिक्षकाचे वैदयकीय परिपूर्ती देयक यासाठी अनुदान २९ जानेवारी २०२४ ला देण्यात आले आहेत .सेवानिवृत्त शिक्षकांच्या नियमित पेन्शन जानेवारी २०२४ साठी, १६ कोटी, उपदान ९ कोटी अंशराशिकरण १७ कोटी, १ जानेवारी २०१६ च्या पुर्वी सेवानिवृत्त शिक्षकाच्या ७ व्या वेतन आयोगाच्या ४ हप्ता ३ कोटी,१ जानेवारी २०१६ नंतरच्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या ७ व्या वेतन आयोगाच्या २ ते ४ हप्तासाठी १४ कोटी, सध्या कार्यरत शिक्षकांच्या ७ व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या ४ हप्ता साठी ३३ कोटी ७३ लाख, सेवा निवृत्त शिक्षकांच्या थकित वेतन साठी २ कोटी ८३ लाख, सध्या कार्यरत शिक्षकांच्या जानेवारी २०२४ च्या नियमीत वेतनासाठी ५१ कोटी रुपये प्राप्त झालेले असून सर्व देयके ट्रेझरी मध्ये गेलेले आहे.

.      हिवाळी अधिवेशनात “स्वतंत्र मजदूर युनियन संलग्नित संघटना, स्वतंत्र समता शिक्षक संघ चे राज्य अध्यक्ष सुनिल तेलतुंबडे व जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष देवांस उराडे यांच्या नेतृत्वात शासनाला निवेदन सादर केलेले होते. शासनाने सेवानिवृत्त शिक्षकांच्या आर्थिक समस्याचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न निश्चितच केल्याचे दिसून येत आहे. शासनाकडे पुन्हा अनुदान चंद्रपूर जिल्हा परिषदेकडून मागण्यात आलेले असून लवकरच पुन्हा अनुदान मिळणार असल्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी संघटनेला सांगीतले आहे.

.      जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडून पंचायत समिती कार्यालयास सेवानिवृत्त शिक्षकांच्या उपदान व अंशराशिकरण यासाठी अनुदान देण्यात आले असून गटविकास अधिकारी यांनी तात्काळ सेवानिवृत्त शिक्षकांच्या खात्यात रक्कम जमा करावी.अशी मागणी संघटने कडून करण्यात आलेली आहे. तसेच वैद्यकिय परिपूर्ती देयकाची रक्कम शिक्षकांच्या खात्यात जमा होणार आहे. सातव्या वेतन आयोगाचे हप्ते देयक गटशिक्षणाधिकारी यांनी तात्काळ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे सादर केल्यास ७ व्या वेतन आयोगाचे हप्ते मुख्याध्यापक यांच्या शालार्थ लॉगिन वरून ऑनलाईन सेवानिवृत्त शिक्षकाच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

.      स्वतंत्र समता शिक्षक संघ व जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने” शासनाचे व चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन एका पत्रकाद्वारे स्वतंत्र जिल्हा परिषद कर्मचारी संघटना जिल्हा सचिव जयदास सांगोडे, व स्वतंत्र समता शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष राजेन्द्र गेडाम यांनी केले आहे.