अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा

34

मनसेची जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

चंद्रपुर : वरोरा भद्रावती तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे गहू व चणा पिकाचे मोठे नुकसान झाले असून अक्षरशः काही शेतात चणा व गहू पिके जमीनदोस्त झाली आहे, त्यामुळे हाती आलेले पीक आता पूर्णतः अस्मानी सुलतानी संकटात भुईसपाट झाली असल्याने शेतकऱ्यांच्या हातात काहीही लागणार नाही अशी विदारक परिस्थिती असल्याने अस्मानी सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

.       अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले आहेत. खूप मेहनतीने, मन लावून, कष्ट करुन पिकं वाढवली, पण ऐनवेळी पिकं मोठी झाल्यावर आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा निराशा पडली आहे. शेतकरी एकीकडे हमीभावासाठी वर्षानुवर्षे झगडत आहेत. त्यांचा परिस्थितीशी संघर्ष सुरु आहे. असं असताना अवकाळी आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या नशिबाची पुन्हा थट्टा केली आहे. त्यामुळे आपण त्वरित प्रशासनाला आदेश देऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून त्यांना तात्काळ मदत द्यावी, कारण चालू शेती हंगामात अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे जे अतोनात नुकसान झाले त्यावेळी आपल्या सरकारने आदेश देऊन व पंचनामे होऊन सुद्धा शेतकऱ्यांना कुठलाही मोबदला दिला गेला नाही, शिवाय पीक विम्याचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांना मिळाले नाही त्यामुळे अगोदरच संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर गहू, चणा यासाह कापूस व तुरीच्या पिकांचे नुकसान झाल्याने मोठे आर्थिक संकट कोसळले आहे त्यामुळे शेत पिकांचे तात्काळ पंचनामे करुंन शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमावार, जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे. शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आनंद बावणे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष उमाशंकर तिवारी, महेश वासलावार, जनहीत कक्ष विभाग जिल्हाध्यक्ष सुनील गुढे. रमेश काळबांधे, रोजगार स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर व इतर मनसे पदाधिकारी यांनी हे पीक फायदा करून देईल इत्यादीनी केली केली.