अखेर प्रकल्पग्रस्त २० महिला उतरल्या खाणीत

38

 आंदोलन चिघडले : आत्मदहणाचा ईशारा 

भद्रावती : ५९ दिवसांपासून केपीसीएल कंपनीविरोधात बरांज येथील प्रकल्पग्रस्त महिलांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाकडे जिल्हा प्रशासन व कंपनीने दुर्लक्ष केल्याचा आरोप करून शुक्रवारी २० महिलांनी खुल्या खाणीच्या खड्ड्यात उतरून आत्मदहन आंदोलन सुरू केले. दरम्यान, पोलिस विभागाने कंपनीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर १६ तासांनंतर १० महिला बाहेर निघाला, तर १० महिलांनी लिखित आश्वासन द्या, असे आग्रह धरून रात्री ९: ४० पर्यंत खड्यातच होत्या, अशी माहिती आहे. या घटनेने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

.         बरांज मोकासा येथील महिला प्रकल्पग्रस्तांच्या १८ मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व कंपनीचे अधिकारी यांनी न्याय मागण्यांबाबत तोडगा काढावा, यासाठी वारंवार बैठका घेण्यात आल्या. मात्र, प्रकल्पग्रस्तांच्या मूळ मागण्या मान्य करण्यात आल्या नाही. त्यामुळे महिलांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. शुक्रवारी पहाटे ३:३० वाजता खुल्या कोळसा खाणीच्या २०० मीटर दोन वेगवेगळ्या खड्यात उतरल्या. बरांज गावठाण खरेदी न करता कोळसा उत्खनन सुरू केल्याने या कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी महिलांनी केली. या घटनेने प्रशासनात खळबळ उडाली.

.         पोलिस उपविभागीय अधिकारी व ठाणेदार व पोलिसांचा ताफा खाण परिसरात पोहोचला. आंदोलक महिलांना बाहेर येण्याचे आवाहन केले. मात्र, त्या तयार झाल्या नाही. दरम्यान, जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांनी माहितीच्या अधिकाराखाली विनोद खोब्रागडे यांना दिलेल्या पत्रावरून पोलिसांनी कंपनीविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर १६ तासांनंतर १० महिला या खड्ड्यातून बाहेर निघाला तर १० महिलांनी लिखित आश्वासन द्या, असे म्हणत रात्री ८ वाजेपर्यंत खुल्या खाणीतच होत्या.