चिंतामणी विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमातून अंधश्रधा निर्मूलनाचा संदेश

31

विद्यार्थ्यांनी सादर केले एकापेक्षा एक सरस नृत्य

उदघाट्न कार्यक्रम दरम्यान मान्यवरांचे मार्गदर्शन

विसापूर : येथील चिंतामणी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम नुकताच पार पडला. यामध्ये विद्यार्थ्यांनी लावणी, भारूड, देशभक्ती, चित्रपट आदी गीतावर एकापेक्षा एक सरस नृत्याविष्कार सादर करून साऱ्यांना आश्चर्यचकित केले. दरम्यान अंधश्रधेवर आधारित लघुनाटिकेच्या माध्यमातून चिंतामणी विद्यालयाच्या चिमुकल्या सिताऱ्यांनी समाजाला जागृतीचा संदेश दिला. हा सांस्कृतिक महोत्सव रंगारंग कार्यक्रमाने चांगलाच बहरला.

.           कार्यक्रमाचे उदघाट्न सरपंच वर्षा कुळमेथे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रशांत दोतुलवार होते, तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गेडाम, रीना कांबळे, वैशाली पुणेकर, विद्या देवालकर, सुचिता जिरकुंतावार, सामाजिक कार्यकर्ता राजू लांडगे, भाजपाचे युवा कार्यकर्ता संदीप पोडे यांची उपस्तिथी होती.

.           सांस्कृतिक कार्यक्रम दरम्यान नृत्य व लघुनाटिकेच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी कला गुणांची मुक्त उधळण केली. अंधश्रध्येवरील नाटिका जणसामान्यात जागृतीचा संदेश देणारी ठरली. विद्यार्थ्यांचे नृत्यावरील उत्कृष्ट सादरीकरण सुद्धा सुखद धक्का देणारे ठरले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्रीडा प्रकारात कौशल्य दाखविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सुवर्णं, रजत व कास्य पदक प्रदान करून गौरविण्यात आले.

.           प्रास्ताविक चंद्रकांत पावडे यांनी केले. संचालन श्रेया निब्रड हिने केले. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.