भेजगाव – सिंतळा ग्रामपंचायतीवर प्रशासक राज 

32

   ग्रामपंचायतचा पंचवार्षिक कार्यकाळ पूर्ण  

मूल : तालुक्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या भेजगाव ग्रामपंचायतीचा पंचवार्षिक कार्यकाळ 11 जानेवारीला संपला. मात्र यापूर्वी निवडणूक झाली नसल्याने नवीन सरपंच निवडीसाठी वेळ आहे. सध्या स्थितीत भेजगाव व सिंतळा या ग्रामपंचायतीवर निवडणूक लागून नवीन सरपंच पदाची निवड होईपर्यंत प्रशासक राज असणार आहे.

.         महाराष्ट्र ग्रामपंचायत अध्यादेश-2020 अन्वये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 151 मधील पोट कलम (1) मध्ये, खंड (क)मध्ये नंतर जर नैसर्गिक आपत्ती किंवा आणीबाणी किंवा युद्ध किंवा भीती आणीबाणी किंवा प्रशासकीय अडचण किंवा महामारी इत्यादींमुळे राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार पंचायतीच्या निवडणुका घेणे शक्य नसतील तर राज्य शासनाच्या पंचायतीचा प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याची तरतूदीनुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी 25 जानेवारी ला आदेश काढत भेजगांव ग्रामपंचायत साठी पंचायत समितीचे कृषी अधिकारी किशोर चौधरी तर सिंतळा येथील ग्रामपंचायती करीता आरोग्य विस्तार अधिकारी चंद्रकांत जक्कुलवार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.

.         मुल तालुक्यातील भेजगाव, सिंतळा येथील पंचवार्षिक निवडणूक सप्टेंबर 2018 रोजी पार पडली 11 जानेवारी 2019 ला सरपंचांनी पदभार स्वीकारला होता. भेजगांव ग्रामपंचायत 11 सदस्य असून यावेळी जनतेतून सरपंच निवडायचे असल्याने भेजागाव ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे अखिल गांगरेड्डिवार सरपंच तर नऊ सदस्य भाजपाचे निवडून आल्याने उपसरपंच पदी भाजपाचे बबन लेनगुरे यांनी सत्ता उपभोगली. तर सिंतळा येथे भाजपाचे विलास चापडे यांनी सरपंच पदी विराजमान झाले.

.         निवडणूक विभागाच्या वतीने दोन्ही ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना सुरू असून वार्डनिहाय आरक्षण अजूनही पडले नसल्याने सध्या तरी ग्रामपंचायत निवडणुका कधी होतील हे निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे प्रशासकाची हाती सत्ता असणार आहे.