केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या व्यवस्थेवर प्रा. कराळेंचा घणाघात 

27

भिसी येथे स्पर्धा परीक्षा व स्वयंरोजगारावर मार्गदर्शन

चिमूर : तालुक्यातील भीसी येथे स्पर्धा परीक्षा व स्वयरोजगार केंद्र द्वारे आयोजित चला अधिकारी घडवूया हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात फिनिक्स अकॅडमी वर्धा चे संचालक प्रा. नितेश कराळे आपला गावरानी भाषेत उपस्थितांचे मनोरंजनात्मक प्रबोधन करीत केंद्र व राज्य सरकार च्या धोरणांचा पाढा वाचला.

.         प्रा.कराळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की, एकीकडे सरकार गॅस सिलेंडर, पेट्रोल,डिझेलचे दर वाढवून सामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थती कमजोर करीत आहे तर शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा योग्य हमीभाव पण देत नसून मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ करत आहे.सामान्य नारीकांना लागणाऱ्या दैनंदिन वापराच्या जी.एस. टी.लावून आर्थिक अडचण निर्माण करीत असल्याचे ते म्हणाले.

.         विद्यार्थी व पालकांना संबोधित करीत त्यांनी मोबाईल च्य चांगल्या व वाईट वापराविषयी माहिती दिली. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यशाचा मूलमंत्र सांगितला.

.         या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून काँग्रेस चिमूर चे समन्वयक डॉ. सतीश वारजूकर, माजी आमदार डॉ.अविनाश वारजुकर,राष्ट्रवादी काँग्रेस चे अरविंद रेवतकर, काँग्रेस नेते.एन. डी.किरसान,  गडचिरोली काँग्रेस चे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, गोंडवाना विद्यापीठाचे सदस्य विजय घरत,प्रा नत्थु गिरडे, सामाजिक कार्यकर्ते सचिन गाडीवार, कादरबाबू शेख,काँगेस चे चिमूर तालुका अध्यक्ष विजय गावंडे उपस्थित होते.

.         या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री छत्रपती शाहू महाराज बुहू.संस्था, हनुमान व्यायाम मंडळ, कमांडो ग्रुप, मॅजिक अकॅडमी, टायगर ग्रुप, हनुमान व्यायाम मंडळ, वाढोना रोड भिसी यांनी परिश्रम घेतले.