*प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट चे वितरण

34

        जेसीआय मुल चा अभिनव उपक्रम       

मुल : मानव सेवा हीच ईश्र्वर सेवा मानून काम करणाऱ्या जेसीआय संस्थेने गणराज्यदिनाचे औचित्य साधत टेकाडी आकापूर मरेगावं या जिल्हा परिषद शाळातील 500 विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट चे वाटप केले. जेसीआय ही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी मोठी सामाजिक संस्था आहे.वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवून आपली सामाजिक बाधिलकी जेसीआय संस्थेचे पदाधिकारी कायम राखत असतात.

.         त्याच उपक्रमाचा भाग म्हणुन जेसीआय मुलं ने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत टेकाडी मरेगावं आणी आकापूर या गावातील जिल्हापरिषद च्या विद्यार्थ्यांना पाचशे शैक्षणिक किट वाटप करून विद्यार्थ्यांना मदत केली. यावेळी त्या त्या गावातील प्रतिष्ठित नागरिक आणी शाळेचे शिक्षक उपस्थित होते.त्याच्या या उपक्रमाचे गावातील नागरिकांनी कौतुक केले आहे.

.         किट वाटप चा उपक्रम पार पाडण्यासाठी जेसिआय मुल चे अध्यक्ष ऋतिक गोयल, सचिव यश चिमडॆलवार, उपाध्यक्ष आशिष उधवाणी, तसेच आशिष गोयल, अनिकेत अग्रवाल, सनी खियानी, कृष्णा सूचक, अमन गोयल, आल्हाद मोगरे, धवल जैन, निर्मल पडगेलवार, आदित्य बुक्कावार, हर्षल मार्टिवार, शुभम अग्रवाल या सर्वांनी यशस्वी नियोजन करीत मेहनत घेतली.