शासकीय कामकाजात अडथळा : सिंदेवाही नगराध्यक्षाना अटक

35

◾ जामीनावर सुटका

सिंदेवाही

.           भारत सरकार कडून सध्या सुरू असलेली विकसित भारत संकल्प यात्रा सिंदेवाही नगर पंचायत परिसरात पोहचताच त्या कार्यक्रमाला विरोध दर्शवुन शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणार्‍या सिंदेवाही नगरपंचायतीचे नगराध्यक्ष स्वप्नील कावळे यांचेवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आल्याची खळबळजनक घटना प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी घडली असून न्यायालयाने जामीन मंजूर करून नगराध्यक्ष स्वप्नील कावळे यांची सुटका केलेली आहे.

.           प्राप्त माहिती नुसार सध्या भारत सरकार मार्फत राबविन्यात येत असलेल्या शासकिय योजनांची माहीती नागरिकांना व्हावी म्हणून शासनातर्फे विकसीत भारत संकल्प यात्रा ही मोहीम राबविण्यात येत आहे. सदर मोहीमेत योजनांची माहीती देण्यासाठी शासकिय अधिकारी हे चित्ररथासह गावागावात जावून माहिती सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. विकसित भारत संकल्प यात्रा हा कार्यक्रम भारत सरकारचा असताना चित्ररथावर मोदी सरकार संकल्प यात्रा असे फलक लावले असल्याचे गावागावात दिसून येत आहे.

.           सदर कार्यक्रमास कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातुन संरक्षण देण्यात यावे याबाबतचे पत्र पोस्टे ठाणेदार यांना संवर्ग अधिकारी, पंचायत समिती सिंदेवाही नगर पंचायत, सिंदेवाही यांचेकडुन दिलेले होते. त्यामुळे सदर संकल्प यात्रा कार्यक्रम हा दि. २४ जानेवारी रोजी नगर पंचायत, सिंदेवाही चे आवारात घेण्यात येणार असल्याने मा. ठाणेदार यांचे आदेशाने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सागर महल्ले, अंडेलकर, रणधिर मदारे व इतर पोलीस कर्मचारी यांची दुपार पासुन नगरपंचायत कार्यालय सिंदेवाही येथे विकसीत भारत संकल्प यात्रा अभियान च्या बंदोबस्तकामी ड्युटी लावण्यात आली होती. त्यानुसार सर्व पोलीस कर्मचारी नगर पंचायत कार्यालय सिंदेवाही येथे कार्यक्रम ठिकाणी हजर होते. तसेच नगरपंचायत लेखाधिकारी सुरज गायकवाड व इतर नगर पंचायत कर्मचारी सुद्धा उपस्थित होते.

.           कार्यक्रमाच्या ठिकाणी एलइडी स्क्रीन, व मोदी सरकार विकसित संकल्प यात्रा असा बॅनर लावलेले वाहन उभे करण्यात आले. सदर वाहनावर भारत सरकार यांचेकडुन नागरिकांसाठी राबविलेल्या शासकिय योजनांची माहीती देणारी एलईडी स्क्रीन लावून नगर पंचायत लेखाधिकारी सुरज गायकवाड हे शासकीय योजनांची माहिती देत असताना सदर ठिकाणी नगर पंचायत नगराध्यक्ष स्वप्नील योगिराज कावळे, हे अचानक कार्यक्रमस्थळी येवुन सुरज गायकावाड यांच्या हातातील माईक जबरदस्तीने हिसव कावुन घेतला. त्यांनतर त्यांनी संकल्प रथाचे वाहनावर चढुन शासकिय योजनांची माहीती असलेले पत्रके काढुन घेवुन तुम्ही बॅनरवर माझे नाव का लिहले? माझे नाव लावण्याचा तुम्हाला अधिकार कोण दिला ? असे प्रश्न उपस्थित करून तुम्हाला कार्यक्रम करायचा असल्यास तुम्ही दुसरीकडे जावुन कार्यक्रम करा. येथे कार्यक्रम केला तर मी तुम्हाला पाहुन घेतो असे म्हणुन त्यांनी सुरज गायकवाड यांचेसोबत वाद घालने सुरू केले. तेव्हा सुरज गायकवाड यांनी नगराध्यक्षांना म्हटले की, ” तुम्ही शासकिय कामात जबरदस्तीने अडथळा निर्माण करीत आहात”. तसेच सुरज गायकवाड पोलीस कर्मचारी यांना उद्देशून म्हटले की, ” तुम्ही साहेब काय पाहुन राहीले, शासकिय योजनेत असे करु शकते काय ? बाजुला घ्या यांना. सगळे काय करता तुम्ही ,? कशाला आहे तुम्ही.? बघ्याची भुमीका घेवुन राहीले का ? सदर ईसम हे जबरदस्ती करुन शासकिय कामात व्यत्यय आणत आहेत ” असे गायकवाड यांनी म्हणाले असता पोलीस कर्मचारी रणधिर मदारे हे त्यांना रोखण्यासाठी गेले असता नगराध्यक्ष स्वप्नील योगिराज कावळे यांनी त्यास ढकलुन बाजुला केले व तुम्ही मध्ये पडु नका तुम्हाला पण पाहतो असे म्हणाले तेव्हा लागलीच पोलीस कर्मचारी येवुन नगराध्यक्ष स्वप्निल कावळे यास बाजुला करुन त्यांना तेथुन बाहेर नेले.

.           त्यांनतर कार्यक्रम संपल्यानंतर सदर घटनेची माहिती सहा. पोलीस उपनिरीक्षक सागर महल्ले यांनी वरिष्ठांना सांगितली.त्यामुळे सदर घटनेची चौकशी करुन व घटनेची शहानिशा करून नगराध्यक्षवर गुन्हा दाखल करून प्रजासत्ताक दिनी दहाच्या सुमारास अटक करण्यात आली.

.           सदर घटनेची माहिती होताच कॉग्रेस कार्यकर्ते हे पोलीस स्टेशन परीसरात जमा झाले. व काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती हाताबाहेर जावू नये. व कोणताही अनुचित प्रकार घडू नये. म्हणून सिंदेवाही पोलीस प्रशासन सज्ज झाले होते. व पोलीस प्रशासनाच्या समन्वयातून वातावरण शांत करण्यात आले. त्यानंतर पोलिस विभागाने सर्व सोपस्कार पूर्ण करून सिंदेवाही नायालयात प्रकरण दाखल करून नगराध्यक्ष स्वप्नील कावळे यांना न्यालयाता हजर केले असता न्यायालयाने नगराध्यक्ष स्वप्नील कावळे यांना जमानतीवर सुटका केली आहे.

.           सदर संपूर्ण प्रकरणाची चौकशी सिंदेवाहीचे ठाणेदार तुषार चव्हाण सहा पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस उपनिरीक्षक सागर महल्ले तसेच पोलीस कर्मचारी पुढील तपास करीत आहेत.