मनसे जिल्हा उपाध्यक्ष संजय पारडवार यांच्यासह तीन जणांवर ॲट्रोसिटी चा गुन्हा दाखल

27

ब्रम्हपुरी पोलीसात गुन्हा दाखल

ब्रम्हपुरी

.         सार्वजनिक बांधकाम विभाग ब्रम्हपुरी येथे उपविभागीय अभियंता म्हणून कार्यरत असलेले अजय चंहादे यांच्या तक्रारीवरून मनसे जिल्हा उपाध्यक्ष संजय पारडवार यांच्यासह तीन जण असे एकूण चौघाविरोधात ॲट्रोसिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

.         पोलीस सूत्रानुसार १२ जानेवारी ला सकाळी ११ वाजता नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाच्या समोर एका विद्यार्थांनी चा अपघात होऊन ती मरण पावल्याने घटना स्थळी फिर्यादी उपविभागीय अभियंता अजय चंहादे गेले असता. काही लोक कार्यालयात येऊन गोंधळ घालत असल्याचे कर्मचाऱ्यांनी फिर्यादी ला फोन करून माहिती दिली. यानंतर २:३० वाजता फिर्यादी कार्यालयात गेल्यानंतर मनसे जिल्हा उपाध्यक्ष संजय पारडवार, युवा सेना तालुकाध्यक्ष यादव रावेकर, युवासेना शहराध्यक्ष करम अली, राहुल सोनटक्के यांनी फिर्यादी येताच अश्लिल व जातीवाचक शिवीगाळ सुरू केले.व जीवे मारण्याची धमकी दिली.

.         फिर्यादी आपल्या कॅंबीन मध्ये गेले असता चौघे सुध्दा मागे टेबल असलेले कागदपत्रे फेकले आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. यांची तक्रार सार्वजनिक उपविभागीय अभियंता अजय चंहादे ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली. असता आरोपी मनसे जिल्हा उपाध्यक्ष संजय पारडवार, युवासेना तालुकाध्यक्ष यादव रावेकर, युवासेना शहराध्यक्ष करम अली, राहुल सोनटक्के यांच्या विरोधात ३५३,२९४,५०६,३४ भादवी सहकलम ३,(१) (R) (S) अनुसूचित जाती जमाती अत्याचार अधिनियम १९८९ अंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आले. सदर आरोपींना सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.सत्र न्यायालयाने तीनही आरोपी चा जामीन नामंजूर करून कारागृहात रवानगी केली,