पाच वर्षात नागभीड कोथुळना मार्ग ऊखळला

50

नागभीड

.            नागभीड बोथली कोथुळना हा रस्ता पाच वर्षात ऊखळला आहे.रस्त्यावर दुचाकी वाहक घसरुन पडु शकतात. संबंधित विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. सन 2019 मध्ये या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. माञ हे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे असल्याने या मार्गाची वाट लागली आहे.

.            हा मार्ग नागभीडला जोडणारा असल्याने व मुख्य रस्ता असल्याने ग्रामीण जनता हा मार्गाने ये जा करीत असते. शाळकरी मुले सुद्धा या मार्गाने ये जा करतात. करोडो रुपये खर्च करुन रस्ते बनविल्या जातात. माञ पाच वर्षात रस्ता खराब होत असेल तर रस्तावरचे डांबरीकरण किती चांगले झाले असेल. या मार्गावर जड वाहतुक अजिबात नाही. तरी हा मार्ग जागोजागी ऊखळलेला आहे. या मार्गाचे काम साईबाबा कंट्रक्शन कंपनीने केले आहे.मुख्यमंञी सडक योजना असे नाम फलक आहे. पांच वर्षे दुरुस्तीचे काम हे कंपनीकडे आहे. रस्ता दुरुस्तीसाठी १४.४० लक्ष रुपये पाच वर्षासाठी ठेवलेला आहे. हा निधी केव्हा खर्च होणार आहे. जिथे जिथे रस्ता ऊखळलेला तिथे दुरुस्तीचे काम सुरु करावे अशी जनतेची मागणी होत आहे.