आनंद निकेतन विज्ञान कला व वाणिज्य महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनाची रासेयो शिबिराला भेट.

26

वरोरा

.      महारोगी सेवा समिती आनंदवन व्दारा संचालित आनंद निकेतन महविद्यालयाच्या वतीने तुमगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मृणाल काळे व शिबिर प्रमुख प्रा. मोक्षदा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला कार्यक्रमाचे सुरवात दिपप्रज्वलन करून करण्यात आले.

.      या शिबिरात महाराष्ट्रातील वर्धा येथील सुप्रसिद्ध लोकप्रिय सप्तखंजेरीवादक जेष्ठ किर्तनकार इंजि. भाऊ थुटे यांच्या समाजप्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. यात व्यसनमुक्ती, मतदान जागृती व संतांचे विचार व्यक्त केले. यावेळी महविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष देवानंद अलोने, कोषाध्यक्ष कमलाकर डुकरे, महासंघ प्रतिनिधी सुनील चिमुरकर, सचिव सचिन नक्षिणे,संघटक भुपेश साखरे, संतोष गुंतीवार, सहसचिव प्रफुल थुटे, निखिल डुकरे, संकेत कायरकर व सर्व प्राध्यापक वृंद, स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होते. कार्यक्रमाचे सांगता राष्ट्रवंदनाने करण्यात आली.