म्हसली येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उदघाटन

29

सात दिवस विविध उपक्रम

नेरी

.        नेरी वरून जवळ असलेल्या म्हसली येथे ग्रामगीता महाविद्यालय चिमूर अंतर्गत राष्ट्रीय सेवा विभाग व ग्रामपंचायत म्हसली च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे दि 10 जाने ला या शिबिराचे भव्य उदघाटन संपन्न होऊन विविध कार्यक्रमाला सुरवात झाली.

.        गोंडवाना विद्यापीठअंतर्गत ग्रामगीता महाविद्यालयाने म्हसली येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन करून दि 10 जाणे ला या शिबिराचे उदघाटन करण्यात आले या उदघाटन सोहळ्याला उदघाटक म्हणून प्राचार्य धम्मानी तर अध्यक्ष म्हणून सरपंच संकेत सोनवाने उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शील,ठक्कर तसेच गावातील मान्यवर मंडळी उपस्थित होते महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.

.        ग्राम विकास साधण्यासाठी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना श्रम प्रतिस्था निर्माण होऊन कला गुणांनाचा विकास साधण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सुजनशीलतेचा विकास साधून तो एक सामाजिक नागरिक बनतो आणि राष्ट्र निर्मिती ला योगदान द्यावा यासाठी सदर शिबिराचे आयोजन केले जाते असे मार्गदर्शन मान्यवरांनी केले सदर शिबीर सात दिवस चालणार असून यामध्ये ग्रामस्वच्छता करून विविध समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहे तसेच रात्रोला सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून गावकऱ्यांचे मनोरंजन करण्यात येणार असून आरोग्य विषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे विद्यार्थी प्राध्यापक कर्मचारी ग्रा प सर्व सदस्य कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.