अंमलनाला धरणात बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू

90
  • कोंबडापार्टी ठरली शेवटची

गडचांदूर

. अंमलनाला धरण परिसरात ठेकेदारांनी मजुरासाठी कोंबडापार्टी ठेवली. कोंबडा पार्टी करून घरी परतत असताना एका ने अंमलनाला धरणात उडी घेतली यात बुडून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना दि..१० ळा दुपारी ३.३० वाजता घडली. प्रदीप सुरेश कोरांगे (२५) रा. लखमापूर असे मृतकाचे नाव आहे.

शोध घेतांना आपत्ती व अपास संस्थेचे कर्मचारी

.          . पोलीस सूत्रानुसार गडचांदूर येथील मुस्ताक अली या कंत्राटदारकडे काही तरुण मिस्त्री व मजूर म्हणून काम करतात. दिवसभर काम आटोपल्यानंतर मजुरांना खुश करण्यासाठी ठेकेदारांनी त्यांना अंमलनाला धरणा जवळ कोंबडा पार्टी देण्याचे ठरविले त्यानुसार सर्व मिस्त्री व मजूर आपल्या दुचाकी ने अंमलनाला धरणाजवळ आले. या पार्टीत मृतक प्रदीप व त्याचा लहान भाऊ दोघेही आले होते तिथे कोंबडा व दारू पार्टी झाली. पार्टी इंजाय केल्यानंतर सर्व आपल्या दुचाकीने दुपारी ३.३० वाजता परतीच्या वाटेने निघाले. यात प्रदिप चा लहान भाऊ संदीप याने आपल्या दुचाकीवर प्रदीप ला बसायला सांगितले. प्रदीप दुचाकीवर बसला आणि लगेच उतरला. मी बसत नाही तुम्ही जा असे म्हणत तो अंमलनाला धरणाकडे धावत गेला आणि धरणात उडी मारली. त्याच्या पाठोपाठ त्यांच्या मित्रांनी पण धरणात उड्या मारल्या मात्र प्रदीप दिसत नसल्याने सर्वांचीच दांदलं उडाली. त्याचा शोध घेऊनही शोध लागत नसल्याने गडचांदूर पोलिसांना पाचारन करण्यात आले. घटनास्थळी तात्काळ गडचांदूर पोलीस दाखल झाले. पोलीस प्रशासनाच्या वतीने शोध मोहीम राबविण्यात आली मात्र शोध लागत नसल्याने अखेर जिल्हा बचाव दल यांना पाचरण करण्यात आले. यावेळी पुंडलिक ताकसांडे, अजय यादव, ताराचंद कोटकीडवार,सचिन उपरे, आपदा मित्र असलेले अप्पास संस्था ची रेस्क्यू टीम चे विशाल मोरे हर्षल मोटके ,पंकज खाजोने,हर्षल बाकडे,प्रशांत राऊत,अमित नन्नावरे, बंटी खडके आदीनी शोध मोहीम सुरु केली. दि. ११ ला प्रदीप चा मृतदेह मिळाला असुन गडचांदूर पोलिसात मर्ग दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहे.