मुधोली येथे १८ ते २४ जानेवारीला राष्ट्रीय सेवा योजना शिबिर

43

विवेकानंद महाविद्यालयाचा उपक्रम

भद्रावती 

.          गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित व विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोरा द्वारा संचलित  स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘मेरी माटी मेरा देश’ या संकल्पनेवर आधारित विद्यापीठ आपल्या गावात, राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे आयोजन येत्या १८  ते २४ जानेवारी  दरम्यान तालुक्यातील मुधोली गावात करण्यात आले आहे.

.          याशिबिराचे उद्घाटन १९ जानेवारीला दुपारी ३ वाजता होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोरा चे उपाध्यक्ष जयंत टेमुर्डे राहणार आहेत. विधान परिषदेचे आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रवींद्र शिंदे असतील. यावेळी स्वर्गीय श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, मोहर्ली वन विभागाचे आरएफओ संतोष थिपे, विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोरा चे कोषाध्यक्ष अभिजीत बोथले, जिल्हा परिषद चंद्रपूरचे माजी सभापती तुळशीराम श्रीरामे, माजी सदस्य मारोती गायकवाड आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

.          20 तारखेला शनिवारी गावातील नागरिकांसाठी आरोग्यविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात वैद्यकीय अधिकारी  डॉ. राजू बोबडे, डॉ. दिनेश मेश्राम हे तपासणी करतील. बौद्धिक कार्यक्रमात भद्रावती येथील सामाजिक कार्यकर्त्या सुषमा शिंदे बेटी बचाव बेटी पढाव या विषयावर मार्गदर्शन करणार असून दुसऱ्या सत्रात ग्राहक संरक्षण कायदा २०१९ या विषयावर अखिल भारतीय ग्राहक पंचायत चंद्रपूरचे पदाधिकारी पुरुषोत्तम मत्ते,वसंत वऱ्हाटे, वामन नामपल्लीवार, पत्रकार प्रवीण चिमूरकर  सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षक परिषद  चन्द्रपुर मार्गदर्शन करणार आहेत. २१ तारखेला रविवारी कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले असून भद्रावती बार असोसिएशनचे ॲड. राजरत्न पथाडे, ॲड .प्राशिष ताठे, ॲड. सुनील नामोजवार कायदेविषयक मार्गदर्शन करतील. २२ तारखेला ग्रामीण विकासात युवकांचे योगदान या विषयावर स्तंभलेखक डॉ. यशवंत घुमे हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर मेरी माटी मेरा देश या विषयावर डॉ. जयवंत काकडे यांचे मार्गदर्शन होईल. २३ तारखेला मंगळवारी  पशुचिकित्सा शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात डॉ. वसंत जांभुळे, डॉ. विकास ताजने, डॉ. दीपक बेहानिया , डॉ .दत्ता नन्नावरे, डॉ. भागवत दाबेराव पशुंची चिकित्सा करतील. दुपारच्या बौद्धिक सत्रात मतदान जागृती व रस्ता वाहतूक सुरक्षा या विषयावर नायब तहसीलदार मल्लीक पठाण, वाहतूक शाखेचे पोलीस चंदू ताजने, डॉ. विजय टोंगे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

.           २४ जानेवारीला बुधवारी सकाळी  १०वाजता समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोरा सचिव अमन टेमुर्डे राहतील. प्रमुख मार्गदर्शक भद्रावतीचे तहसीलदार अनिकेत सोनवणे राहतील. प्रमुख अतिथी म्हणून भद्रावती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आशितोष सपकाळ, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. श्याम खंडारे, जिल्हा समन्वयक डॉ. विजया गेडाम, माजी सदस्य महेश टोंगे उपस्थित राहतील. या शिबिराचे यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. उत्तम घोसरे, सहकार्यक्रम अधिकारी डॉ. रमेश पारेलवार, मुधोलीचे सरपंच बंडू नन्नावरे, उपसरपंच वैशाली सिडाम, पोलीस पाटील सुनीता गराटे, मुख्याध्यापक कैलास उरकुडे, शंकर गायकवाड, ग्रामसेवक, विजय पचारे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष प्रमोद सोनवणे, वन हक्क समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण दडमल, वन समिती अध्यक्ष कार्तिक राणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हनुमान राणे यांच्यासह ग्रामस्थ करीत आहेत. या शिबिरात सतत सात दिवस महाविद्यालयातील ७५ शिबिरार्थी मुक्कामी सहभागी राहणार असून दररोज श्रमसंस्कार, सर्वेक्षण, बौद्धिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.