कुणी औषध देता काय औषध ?

91
  • रुग्णांचे हाल  अधिकारी झोपेत
  • नागरी येथील शासकीय रुग्णालयात भोंगळ कारभार

शिवसेना (उबाठा ) चे विधानसभा युवा अधिकारी अभिजीत कुडे यांनी केली पोलखोल

वरोरा :- तालुक्यातील नागरी शासकीय रुग्णालयात भोंगळ कारभार सुरू आहे. येथे आलेले रुग्ण म्हणतात ” कुणी औषध देता का औषध ”  अशी परिस्थिती झाली आहे  या आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त आहे. तरी मायबाप सरकारचे याकडे लक्ष नाही. या आरोग्य केंद्राची आरोग्य सेवा पूर्णपणे ढसाळली आहे.  तात्काळ रिक्त जागा भरून आरोग्य सेवा सुरळीत करावी अन्यथा शिवसेना आक्रमक भूमिका घेणार.असल्याचे  शिवसेना विधानसभा युवा अधिकारी अभिजीत कुडे यांनी सांगितले.

.

खुर्ची खाली अधिकारी गायब

नागरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आसपासच्या परिसरात 15 गावातील रुग्ण येत असतात. भागातील एकमेव दवाखाना असून तिथे रूग्णांना आरोग्य सेवा मिळत नाही. इतका मोठा दवाखाना असून फक्त 1 डॉक्टर आणि 1 परिचारिका तिथे होती. 30 रुग्ण असून 1 परिचारिका, रुग्णाचे नाव लिहायला सुद्धा माणूस नाही, औषध देणारे यांची बदली झाली असून तिथे सध्या कुणी नाही मग लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने इथे मुबलक प्रमाणात परिचारिका आणि सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी पण अधिकारी मात्र झोपा काढत आहे हे दिसून आले. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा युवा अधिकारी अभिजित कुडे यांनी शासकीय रुग्णालयात जावून बघितले तर 30,35 रुग्ण आढळून आले मात्र 1 डॉक्टर 1 परिचारिका साधी रुग्णाने नाव लिहायला कुणी नाही, औषध वितरण करणारे कुणी नाही, भोंगळ कारभार सुरू आहे. इथे सुट्टी वर असलेल्या कर्मचाऱ्यांचा जागेवर दुसर्‍याला चार्ज असतो पण इथे मात्र कुणी च नाही. रूग्णांना याचा त्रास सहन करावा लागतो. अभिजीत कुडे यांनी आक्रमक भूमिका घेवून वैघकीय अधिकारी याना कॉल करून विचारणा केली तेव्हा त्यांनी तात्काळ परिचारिका पाठवतो असे सांगितले, दररोज तिथे हा च प्रकार सुरू असल्याचे लोकानी सांगितले. अधिकारी ,डॉक्टर, परिचारिका हे तिथे चार्ज असून देखील तिथे राहात नाही. शासकीय रुग्णालय वाऱ्यावर सोडून दिले काय असा प्रश्न उपस्थित होते. रुग्णांची गैरसोय झाली तर शिवसेना पद्धतीने जाब विचारला जाणार असा इशारा विधानसभा युवा अधिकारी अभिजित कुडे यांनी दिला . सर्व सामान्य माणूस सरकारी दवाखान्यात जातो पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते, आरोग्यसेवा बाबत उदासीनता खपवून घेणार नाही, कर्मचारी अधिकारी स्वतः चे कर्तव्य पार पाडत नसेल तर आम्हाला आक्रमण भूमिका घ्यावी लागते. सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी तत्पर आहे.