सिकलसेल आजाराबाबत डॉ. दीप्ती जैन यांचे शुक्रवारी आनंदवनात मार्गदर्शन

39

चंद्रपूर

.            वरोरा स्फूर्ती बहुउद्देशीय संस्थेद्वारे वरोरा तालुक्यात सिकलसेलया आनुवांशिक आजाराबाबत जनजागृतीतपासणी व उपाययोजनेचे काम हाती घेण्यात आले असून या आजाराच्या अचूक मार्गदर्शनासाठी भारत सरकारच्या सिकलसेल टास्क फोर्सच्या अध्यक्षा डॉ. दिप्ती जैन यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

.                             12 जानेवारी शुक्रवारला सकाळी 11 वाजता आनंदवनच्या मुख्यमंत्री सभागृहामध्येसदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या निशुल्क कार्यक्रमास वरोरा तालुक्यातील विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

.                        सिकलसेल आजाराबाबत नॅशनल हेल्थ मिशन व महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या मदतीने स्फूर्ती बहुउद्देशीय संस्था वरोरा, सिकलसेल आजाराच्या शोधतपासणीच्या उद्देशाने महिन्याभरात तालुक्यातील जवळपास 5000 विद्यार्थ्यांची रक्त तपासणी करण्यात आली आहे. 1 ते 40 वयोगटातील वरोरा तालुक्यातील सर्व नागरिकांची रक्त तपासणी करण्याचे उद्दिष्ट असुन लोकसहभागातून सिकलसेल आजाराबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती स्फूर्ती बहुउद्देशीय संस्था करणार आहे.