अखेर पिक विम्याची अंमलबजावणी सुरू

43

 सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी किशोर डुकरे यांच्या आंदोलनाला यश 

वरोरा

.         सोयाबीन पिकावर मोझॉक या रोगाचे सावट आल्याने अख्ख पीक उध्वस्त झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतात जाऊन पाहणी केली आणि ओरिएटंल पीक विमा कंपनीला नुकसान भरपाई देण्याचा ओदश दिला होता मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला पीक विमा कंपनीकडून खो मिळाला. यानंतर सामाजिक कार्यकर्ता तथा शेतकरी नेते किशोर डुकरे यांनी वरोरा तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची होळी केली तर टेमुर्डा येथे चक्का जाम आंदोलन केले होते.

.         १०० टक्के पीक विमा मिळालाच पाहिजे, जय जवान, जय किसान असे नारे देत जिल्हाधिकारी यांनी ओरिएटंल पीक विमा कंपनीला दिलेल्या ओदशाची होळी केली. तसेच शेतकर्‍यांच्या पिक विम्यासाठी टेमुर्डा येथे चक्काजाम आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांच्या आंदोलनाला यश आले असून पिक विम्याची अंमलबजावणी सुरू आहे.
तालुक्यातील मोझॉक या रोगाने थैमान घातले होते. त्यात शेतकर्‍यांचे पन्नास टक्के सोयाबीन शेतकर्‍यांचे हातचे गेले होते.

.         तसेच बुरशी सारखा रोग येवून पिक नष्ट झाले होते. हेक्टरी पन्नास हजार रूपयांची मदत करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी किशोर डुकरे यांनी केली होती. अखेर या आंदोलनाला यश आले असून परिसरात शेतकर्‍यांना पिक विमा कंपनीकडून अंमलबजावणी होत असल्याने शेतकर्‍यांनी आनंद व्यक्त केला आहे.