वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचा मृत्यू

36

मूल तालुक्यातील जानाळा येथील घटना

चंद्रपूर 

.          खरीप हंगाम धान कापणी व चुरणा करण्याची वेळ आली की, नेहमी वाघाच्या घटना घडतच असतात. याच्यावर मात्र शासनाच्या वन अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड शेतकरी बांधवांकडून केली जात आहे. शेतकरी म्हटला तर त्याच्या जनावरांना चारा लागणारच यासाठी शेतातून गुरांसाठी चारा आणायला गेलेल्या शेतकऱ्यावर शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकऱ्यांवर हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना बफर क्षेत्रातील कक्ष क्रमांक ५३३ मध्ये गुरुवारी घडली. रात्रो होऊनही शेतातून घरी परत न आल्याने त्याचा इतरत्र शोध घेतला असता शुक्रवार सकाळी ७ वाजता दरम्यान शेतातलगत असलेल्या जंगलात त्याचा मृतदेह आढळून आला.

.          सुभाष लिंगाजी कडते (४२)रा.जानाळा शेतकऱ्यांचे नाव आहे.नेहमीप्रमाणे घरच्या गुरांना शेतातून चारा आणायला सुभाष शेतात गेला होता.दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने सुभाषवर हल्ला करून जागीच ठार केले.रोजच्या प्रमाणे घरी परत न आल्याने कुटुंबियांनी इतरत्र शोधाशोध केली मात्र सुभाष दिसला नाही.शुक्रवारी सकाळी ७ वाजता शेतातून फरफटत नेल्याचे दिसून आले.त्याच्या ५०० किमी अंतरावर जंगलात सुभाषचा मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत आढळून आला.घटनेची माहिती वनविभागाचे अधिकारी व पोलिसांना देताच वनपरिक्षेत्र अधिकारी कोरेकर आणि कर्मचारी व पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

.          शासनाच्या वनविभागाकडून मृतकाच्या नातेवाईकांना तात्काळ ३० हजार रुपयाची मदत वनपरिक्षेत्र अधिकारी यांचेकडून देण्यात आली. याच वन परिक्षेत्रात यापूर्वीही अनेक वाघाने ठार केल्याच्या घटना घडल्या असून अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी वन विभागाला पुन्हा किती घटनेची अपेक्षा आहे असा सूर मात्र जानाळा ग्रामस्थांमध्ये दिसून आला. वाघाच्या सारख्या दहशतीमुळे शेतकरी आपली शेती कसने सोडून देणार असल्याचे बोलून दाखविले असून वन विभागाच्या अधिकाऱ्यानेच शेतकऱ्याची शेती करावी व शेतकऱ्याला शेतीचा मोबदला द्यावा. तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या वणाला तारेचे कुंपण करुन आपल्या वन्य प्राण्यांचे रक्षण स्वतः करावे. अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.