भद्रावतीत गोंडियन आदिवासी वीर-वीरांगणा सोहळा

32

     महात्मा रावेण यांच्या भव्य शोभायात्रेचे आयोजन     

भद्रावती

.           भद्रावती येथील गोंडीधर्मीय आदिवासी बहुउद्देशीय संघटनेतर्फे शहरातील नाग मंदिराजवळील जिल्हा परिषद हायस्कूल येथे विदर्भस्तरीय संपूर्ण गोंडियन आदिवासी वीर- वीरांगणा जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने शहरातील तहसील कार्यालया जवळील भीवसेन पेनठाणा येथून गोंड राजा महात्मा रावण यांच्या भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले.

.           शोभायात्रेचे उद्घाटन आमदार प्रतिभा धानोरकर व ऊबाठाचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर व शिवसेना ऊबाठाचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, अमित निब्रड, गोंडीधर्मीय आदिवासी संघटनेचे अध्यक्ष रमेश मेश्राम, तेलंगणाचे गोंडी गायक रवी मेश्राम, मेघशाम मेश्राम, काँग्रेस शहराध्यक्ष सुरज गावंडे, बि .डी मडावी, एड प्रमोद गेडाम, गोलू गेडाम, नियोजन कमिटीचे अध्यक्ष संदीप कुंमरे, संदीप नैताम, महादेव सिडाम, त्रिशूल मरसकोल्हे, पिंटू मडावी, विनोद शेडमाके, अविनाश पोदरे, सतीश पेंदाम, हरीश ऊईके, सुवर्णा वरखेडे, शुभांगी मेश्राम, विद्या किनाके, अनिता गेडाम, शितल गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.

.           उद्घाटनानंतर भव्य शोभा यात्रेला प्रारंभ करण्यात आला. सदर शोभायात्रा हायवे, बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, शहरातील मुख्य रस्त्याने निघून कार्यक्रम स्थळी पोहोचल्यानंतर शोभायात्रेची सांगता करण्यात आली. त्यानंतर अन्य विविध कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली. यात तेलंगाना इंद्रावेलीचे सुप्रसिद्ध गायक रवी मेश्राम तथा मेघराज मेश्राम यांच्या गायनाचा, प्रबोधनात्मक कार्यक्रम, पारंपारिक गोंडी नृत्य स्पर्धा आदी कार्यक्रमांचा सहभाग होता. सदर शोभा यात्रेत आदिवासी संस्कृतीला उजाळा देणारे विविध चित्ररथ, विविध आदिवासी नृत्य पथके, पारंपारिक वाद्य पदके तथा आदिवासी समाज बांधवांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

.           सदर कार्यक्रमात विदर्भातील समाज बांधवाशिवाय तेलंगणा, छत्तीसगड, राजस्थान, यवतमाळ,चंद्रपूर गडचिरोली तथा अन्य जिल्ह्यातील आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. शोभायात्रेदरम्यान शिवसेना ऊबाठा जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे तथा संदिप कुमरे व मित्रपरिवार यांचे तर्फे शोभायात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांना नाश्ता व सरबतचे वितरण करण्यात आले.