सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करणे ही काळाची गरज : आ. किर्तीकुमार भांगडीया

41

बोथली (सिरपुर) येथे नागदिवाळी उत्सव साजरा

आ. बंटी भांगडीया यांच्या हस्ते समाज भवन सभागृहाचे लोकार्पण सोहळा संपन्न

नेरी

.          मानव हा समाजशील प्राणी असून मानवाचा विकास साधण्यासाठी सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे ही काळाची गरज आहे. याचं कार्यक्रमातून मानवाचा विकास साधला जातो त्यामुळे पुण्यतिथी जयंत्या सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करायलाच पाहिजे यामुळे समाजातील सर्व घटक एकत्र येतात आणि मनोमिलन होऊन त्यांची जवळीकता निर्माण होऊन एकता निर्माण होते व मानवाचा विकास साधला जातो. आणि यातूनच देशासाठी सुदृढ नागरिकांची पिढी  निर्माण होत असते तेव्हा असे अनेक छोटे मोठे कार्यक्रमाचे आयोजन व्हायलाच पाहिजे असे प्रतिपादन चिमूर विधानसभा क्षेत्राचे कर्णधार किर्तीकुमार भांगडीया यांनी बोथली येथील आयोजित नागदिवाळी मार्गदर्शन कार्यक्रमात केले.

.          नेरी जवळील बोथली येथे दि 24 व 25 डिसें ला आदिवासी माना जमात मंडळ व विद्यार्थी संघटनेच्या वतीने मुक्ताई व नागदिवाळी महोत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला परिसर स्वच्छ करून मूठ पूजा करून सुरवात करण्यात आली. यानंतर महिलांसाठी हळदी कुंकू व सक्षमीकरण कार्यक्रम घेण्यात आले. लगेच मान्यवरांचे मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले.

.          या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून प्रभुजी सहारे से वा शिक्षक मनोहर चौधरी सरपंच तुरणकर मुख्याध्यापक उपस्थित होते. यानंतर रात्रौ शालेय मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

.          दि 25 ला सकाळी पूजा अर्चा करून माँ मानिकादेवी च्या प्रतिमेची मिरवणूक वाजत गाजत महिलांच्या लेझीम पथकांच्या आकर्षित नुत्यांने संपूर्ण गावातून मानिकादेवी च्या जयघोषात काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला पुरुषांनी आकर्षक वस्त्र परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले यानंतर चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत समाज भवनाचे लोकार्पण सोहळा संपन्न करण्यात आले. यावेळी समाज बांधव व गावकरी मोट्या संख्येने उपस्थित होते