चंद्रपुरात ग्राहक दिन उत्साहात साजरा

25

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा उपक्रम : ग्राहकांना त्यांच्या अधिकाराबाबत केले जागृत

चंद्रपूर

.         देशातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या परंतु असंघटित तसेच आपल्या अधिकारांबाबत जागृत नसलेल्या ग्राहकांना त्यांच्या न्याय्य हक्काची जाणीव करून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या चंद्रपूर जिल्हा शाखेने .संत गजानन महाराज देवस्थान सरकार नगर, मूल रोड चंद्रपूर येथे ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

.         या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मार्गदर्शक पुरूषोत्तम मत्ते तर उद्घाटक म्हणून . संत गजानन महाराज मंदिर संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण धोबे व मार्गदर्शक म्हणुन कल्पना जांगडे (कुटे), पूर्व सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग चंद्रपूर, नंदिनी चुनारकर जिल्हाध्यक्ष तथा अशासकीय सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद चंद्रपूर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाला वसंत वऱ्हाटे जिल्हा संघटनमंत्री, चंद्रपूर तालुका अध्यक्ष आण्याजी ढवस हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

.         कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून वसंत वऱ्हाटे यांनी ग्राहक पंचायत स्थापनेमागची पार्श्वभूमी विशद केली. प्रमुख मार्गदर्शक ॲड. कल्पना कुटे यांनी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ व २०१९ यामधील फरक स्पष्ट करून तक्रार निवारण आयोगाकडे मुद्देसूद तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष नंदिनी चुनारकर यांनी मार्गदर्शन करतांना ग्राहकांचे समस्या निवारण करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत कार्य निरंतर सुरू असून शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी उपस्थितांना आवाहन केले. ॲड.सुषमा साधनकर यांनी ग्राहकांनी पिडित न राहता अन्यायाविरुद्ध लढण्याचे आवाहन केले.

.         कैलास गर्गेलवार यांनी आपले विविध अनुभव कथन करून नंदिनी चुनारकर यांनी एका प्रकरणात सहकार्य केल्याबद्दल त्यांचे सभेत आभार मानले. देवस्थानचे अध्यक्ष लक्ष्मण धोबे यांनी ग्राहक पंचायतला नेहमी सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन नवनवीन कायद्यांचा अभ्यास करण्याबद्दल सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पुरुषोत्तम मत्ते यांनी विविध दाखल्यांवरून ग्राहक पंचायतचे कार्य कथन करून चंद्रपूर जिल्ह्यात कार्य विस्तारण्याचे पदाधिकारी यांना आवाहन केले.

.         सुत्रसंचलन वनिता नंदेश्वर यांनी केले तर उपस्थितांचे आभार आण्याजी ढवस यांनी मानले. कार्यक्रमाला संगिता लोखंडे अशासकीय सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद चंद्रपूर, जिल्हा सचिव प्रभात कुमार तन्नीरवार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जितेंद्र चोरडिया, भद्रावती तालुका अध्यक्ष वामन नामपल्लीवार, शंभू अडावदकर, शंकर उपरे, केशव मेश्राम, गुलाब लोणारे, सुनील वनकर, बालाजी दांडेकर, गोकुलदास पिंपळकर, अशोक मुळेवार, दादाजी चन्ने, ज्योती जाधव, नलिनी निखाडे, भोलाराम सोनुले, दिलीप सातपुते, बबिता बोकडे, विद्या बोकाडे, अंजली हिरूरकर, हेमराज नंदेश्वर, सुरेश तुम्मे, महेश कानपिल्लेवार इत्यादींनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विशेष सहकार्य केल्याबद्दल संदीप आवारी ह्यांचे ग्राहक पंचायत चंद्रपूर ने विशेष आभार मानले.