शेतकऱ्यांनी झाडाला गळफास बांधून केली आत्महत्याची पूर्वतयारी

26

 पाजरेपार रीठ येथील आंदोलन चिघडणार 

वरोरा

.          वरोरा तालुक्यातील पाजरेपार रीठ ते आबमक्ता या रस्त्याला मंजुरी द्यावी या मागणीसाठी भीम आर्मी संविधान रक्षकदलाचे तालुका अध्यक्ष जगदीश मेश्राम यांच्या पुढाकारात या परिसरातील शेतकऱ्यांनी ”बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर ” नावाचं अनोखे धरणे आंदोलन सुरू केले आहे.

.          या आंदोलनादरम्यान आपण आत्महत्या करू असे वक्तव्य पाजरेपार रीठ क्षेत्रांतील शेतकऱ्यांनी केले होते. या वक्तव्याचा अनुभव आज २५ डिसेंबर रोज सोमवारला आला असला तरी अजून पर्यंत कोणाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली नाही. केवळ झाडाला गळफास लावून त्याची पूर्वतयारी केलेली आहे.

.          आज २५ डिसेंबर रोज सोमवारला सायंकाळी ५.३० च्या सुमारास वनिता पिपंळकर व वृंदा कावळे या दोन शेतकरी महिला शेतातून येत असताना त्यांना रस्त्यांलगत असलेल्या चिंचेच्या झाडाला दोराचा गळफास लावलेला दिसला.झाडाला गळफास लावून प्रशासनाला दिलेला इशारा प्रत्यक्षात उतरवण्याची कृती कुठल्या तरी अज्ञात शेतकऱ्यांनी केली असल्याचा संकेत असावा. त्यामुळे आता कोणतीही संतापजनक व अनुचित घटना घडू नये. यासाठी जिल्हाधिकारी यांनी तातडीने कारवाई करुन रस्त्याला मंजुरी द्यावी अशी मागणी भीम आर्मी संविधान रक्षक दल वरोरा तालुका अध्यक्ष जगदीश मेश्राम केली आहे.

.          शेतकऱ्यांने गळफास घेण्याचा इशारा दिला आहे त्यामुळे आता जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ रस्त्यांला मंजुरी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना द्यावे.अन्यथा होणाऱ्या घटनांना संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधी राहतील असा इशारा जगदीश मेश्राम यांनी केला आहे.