अबब ! घोडपेठ मधे चक्क सरकारी जमिनीची झाली रजिस्ट्री ?

27

      आम आदमी पार्टी भद्रावतीने केला खुलासा     

भद्रावती

.           भद्रावती तालुक्यातील घोडपेठ मधे चराई करिता सरकारी जमीनीची रजिस्ट्री करण्यात आली अशी तक्रार आम आदमी पार्टी भद्रावती चे शहराध्यक्ष सुरज शहा यांना प्राप्त झाली. त्यांनी चौकशी केली असता, हा सगळा प्रकार भ्रष्टाचाराची संबंधित आहे असं दिसून आलं. काही पैशांसाठी रजिस्टार, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच व इतर काही सदस्यांनी मिळून सरकारी जमिनीची रजिस्ट्री एका व्यक्तीला करून दिली अशी बाब उघडकीस आली.

.           आम आदमी पार्टी भद्रावती तर्फे  जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेण्यात आली. दरम्यान या सगळ्या भ्रष्टाचार विषयी चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टी भद्रावती चे शहराध्यक्ष सुरज शहा यांनी निवेदना द्वारे केली. यावेळी आम आदमी पार्टी चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवर, भद्रावती शहराध्यक्ष सुरज शहा, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक, शहर मीडिया प्रभारी आमीर शेख, युवा जिल्हाध्यक्ष राजूभाऊ कुडे, चंद्रपूर महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, चंद्रपूर महानगर महासचिव तब्बसूम शेख व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.