वरोरा शहरातील क्रीडा संकुल टाकणार कात

102

 

  •  १३ कोटी ९३ लाखाचा निधी होणार उपलब्ध
  •  अद्यावत व सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार
  •   निविदा प्रक्रियेनंतर कामाला होणार सुरुवात
  • रा.काँ. वरोरा विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर यांच्या प्रयत्नांना यश

चंद्रपूर

.            वरोरा शहरातील खेडाळू विविध क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव उंचावत असतानाही वरोरा शहरातील क्रीडा संकुल ३० वर्षांपासून जैसे थे अवस्थेत आहे. लोकप्रतिनिधी ची उदासीनता आणि प्रशासनाच्या दुर्लक्ष पणाचा फटका तरुण खेडाळूना बसला आहे. त्यांची निराशा लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेस चे वरोरा भद्रावती विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर यांनी तालुका क्रीडा संकुलना बाबत क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांना निवेदन देत पाठपुरावा केला याची दखल घेत क्रीडा संकुल साठी १३ कोटी ९३ लाख ५५ हजार ५९२ रुपयाचा चा निधी मंजूर होणार असल्याने आता वरोरा शहरातील तालुका क्रीडा संकुल कात टाकणार आहे.

.  ..             वरोरा शहर व ग्रामीण भागातील खेडाळूना खेळण्यासाठी वरोरा पोलीस स्टेशनं जवळ तालुका क्रीडा संकुल उभारण्यात आले मात्र ३० वर्षाचा कालावधी लोटूनही या क्रीडा संकुलनात कोणतीही सुधारणा झाली नाही. सोबतच हे क्रीडा संकुल विविध उपक्रमासाठी किरायाने दिले जातात. यातून मिळणारा पैसा नेमका कशात खर्च होतो हे मात्र येथील अधिकाऱ्यांनाच माहित. वरोरा शहरा सोबतच तालुक्यातील खेडाळू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अव्वल येऊन वरोराचे नाव उज्वल करीत असतानाही त्यांना सरावा साठी साहित्य उपलब्ध नाही.. नुकतीच काही दिवसापूर्वी राज्य स्तरीय आर्चरी स्पर्धा घेण्यात आली होती मात्र आजच्या युगानुसार त्या किडा संकुल मध्ये कोणत्याही प्रकारच्या किडा संबंधित पंटागण, धावपटटी, स्विमींग पुल, अद्यावत उपकरणे, खो-खो, कबडडी, आर्चरी बॉस्केट बॉल , रनिंग ट्रॅक, सारख्या खेळासाठी साहित्य व जागा उपलब्ध नाही. यामुळे परिसरातील खेळाडूत नाराजीचा सुर दिसून येत असल्याने  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर यांनी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना वरोरा येथील रत्नमाला चौकात 20 नोव्हेंबर 2023 ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वरोरा तर्फे तालुका क्रीडा संकुलनाबाबत निवेदन देण्यात आले होते ना. संजय बनसोडे यांनी याबाबत सकारात्मक चर्चा करून न्याय देऊ असे आश्वासन दिले होते लगेच डिसेंबर महिन्यात सुरू असलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने ना. बनसोडे यांना भेटून त्यांच्यासोबत पुन्हा त्या विषयावर चर्चा केली व वरोरा तालुका क्रीडा संकुलनासाठी 13, कोटी 93 लाख 55 हजार 592 रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय मान्यतेसाठी ते प्रकरण प्रधान सचिव वित्त क्रीडा विभागा कडे सचिवालयाला पाठवण्यात आले. यामुळे आता वरोरा तालुका क्रीडा संकुल कात टाकणार असा विश्वास विलास नेरकर यांनी वर्तविला आहे. त्याबद्दल क्रीडा व युवक कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य ना. संजय बनसोडे यांचे आभार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरोरा विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर तालुकाध्यक्ष रवींद्र भोयर शहराध्यक्ष चंद्रकांत कुंभारे भद्रावती तालुकाध्यक्ष राजू बोरकर वरोरा युवक तालुका अध्यक्ष दिनेश मोहरे यांनी मानले.