अवैध मुरूम उखनन करणाऱ्या कंपनीवर कारवाई करा

41

 नागरिकांचे महसूल विभागाला साकडे 

नेरी

.            चिमूर तालुक्यातील गोंदेडा वडसी परिसरातील टेकडीवर अवैध मूरमा चा उपसा होत असल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी महसूल विभागाला माहिती दिली. महसूल कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्यांचा येण्याचा सुगावा लागताच मुरमाचे उत्खनन बंद करण्यात आले होते. त्यामुळे महसूल कर्मचार्‍यांनी उपसा केलेल्या जागेचा पंचनामा केला. तर उभ्या असलेल्या पोकलांड मशीन आणि चार ट्रकला घटनास्थळा वरून हाकलून लावण्यात आले. मात्र महसूल कर्मचार्‍यांनी कारवाही केली नाही. या अगोदर ही या ठिकाणी अवैध मुरूम उपसा झाला असून या कंपनीची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

.            गोंदेडा वडसी परिसरातील टेकडी वर मागील अनेक दिवसांपासून मुरमाचे उत्खनन सुरू आहे. सदर मुरूम हा रस्त्याच्या बांधकामासाठी नेला जात असून परवाना काढून नेला जात असल्याचे कंपनी प्रशासन नागरिकांना सांगत होते.  मात्र दि 18 ला रॉयल्टी नसल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच अवैध उपसा सुरू असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तात्काळ महसूल विभागाला माहिती दिली  सकाळी मुरूम उपसा सुरू होता. मात्र  महसूल विभाग येणार असल्याची भनक लागताच सदर उपसा करणाऱ्या कंपनीने काम थांबवून ट्रक व पोकलंड मशीन उभी ठेवली यामुळे कारवाई झाली नाही. या आगोदर ही या कंपनीने अनेकदा मुरमाचा उपसा केल्याचा आरोप नागरिकांनी केला. तेव्हा सदर कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

.            सदर ठिकाणी महसूल विभागाने उखनन केलेल्या जागेचा पंचनामा केला असून घटनास्थळी उभ्या असलेल्या मशीन व ट्रकला हाकलून लावले. असून सदर अहवाल वरिष्ठ महसूल विभागाला सादर केले आहे. यावेळी महसूल मंडळ अधिकारी कुंभरे, तलाठी ठाकरे आणि त्याचे सहकारी उपस्थित होते महसूल विभाग कुठली कारवाई करणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.