चंदनखेडा येथील तंमुसच्या पुढाकाराने प्रेमीयुगुल विवाहबद्ध

189

 

भद्रावती

.           तालुक्यातील चंदनखेडा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीने चारगाव येथील सुरेंद्र विश्वनाथ आडे (24) व त्याच गावची सपना अशोक मेश्राम (19) यांनी चंदनखेडा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीकडे अर्ज सादर करुन लग्न लावून देण्याची विनंती केली होती.दिनांक १५ डिसेंबर २०२३ ला. महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोहर शालिक हनवते यांनी दोघांचीही कागदपत्रे तपासून त्यांचा विवाह विठ्ठल रुक्मिणी देवस्थान येथे गावातील पंचासमक्ष लावून दिला.

.           यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर दोडके, दिलिप कुळसंगे, सुशिला हनवते, पोलिस पाटील समिरखान पठाण, तंटामुक्त समिती सदस्य, छाया घुगरे,बशीर शेख, लोकेश कोकुडे,अमर बागेसर,कदिर पठाण, प्रज्वल बोढे, मयुर नन्नावरे,विजय खडसंग, प्रफुल्ल निकोडे, शंकर दडमल, राहुल कोसुरकार,आशिष हनवते व समस्त आदि गावातील उपस्थित होते.यावेळी दोघांनीही ‌सुखदुखात एकमेकांना साथ देण्याची शपथ घेतली.