आनंद निकेतन महाविद्यालयाचे शिक्षकेत्तर कर्मचारी पुन्हा संपावर 

57

वरोरा

.             जुनी पेन्शन योजना सुरू करावी या मागणीसह अन्य मागण्यांना घेऊन महारोगी सेवा समिती वरोरा व्दारा संचालित आनंद निकेतन विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना. संलग्नीत विदर्भ अशासकीय महाविद्यालय शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, जिल्हा चंद्रपूर – गडचिरोली. विदर्भ अशासकीय महाविद्यालय शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, र.नं एन. जी पी. ४७१७. व महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्त कर्मचारी महासंघ र.नं.एन. एस. के. / के. १५०८  सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना या सर्व समन्वय समितीचा   १४ डिसेंबर पासून राज्यव्यापी बेमुदत संपामध्ये महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

.             सदर माहिती पत्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मृणाल काळे. यांच्याकडे सादर करण्यात आले. यामध्ये कार्यकारिणी संघटनेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे मुख्य लिपिक देवानंद अलोने. सचिव प्रयोगशाळा परिचय सचिन नक्षिणे. कोषाध्यक्ष महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक कमलाकर डुकरे,  उपाध्यक्ष . हिना डी. पांडे, सहसचिव प्रफुल बी. थुटे, संघटक भुपेश व्ही साखरे, महिला प्रतिनिधी . अर्चना चव्हाण, कार्यकारिणी सदस्य सुनील चिमुरकर महासंघ प्रतिनिधी म. रा, चेतन नागदेवते, संतोष गुंतीवार, मिलींद मेश्राम, सुमीम शिर्के, तुषार पारखी,  मैनाबाई मगरे. उपस्थित होते.