वृद्धाश्रमातील वृद्धांना ब्लॅंकेट चे वाटप

41

 शैलेंद्र पाटील यांचा अनोखा उपक्रम 

नेरी

.         वाढत्या थंडीपासून वृद्धाचा बचाव व्हावा या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र पाटील यांनी सामाजिक बांधिलकीतुन समाजाला काही देणे आहे. या उदात्त भावनेने पवनी तालुक्यातील सिदपुरी येथील चॅरिटेबल ट्रस्ट व्दारा संचालित अपना घर वृद्धाश्रम या वृद्धाश्रमात वृद्धांना ब्लँकेट वितरित करून मायेची उब दिली सोबत सर्वांना मिठाई वितरित केली.

.         सध्या थंडीने जोर पकडला आहे. या थंडी पासून बचाव व्हावा या हेतूने वृद्धाश्रमातील वृद्धाना ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले. यासाठी चिमूर तालुका अनुसूचित जाती आघाडी चे उपाध्यक्ष यांनी आपल्या सहकार्यासोबत वृद्धाश्रमात संपूर्ण वृद्धांना ब्लँकेट वाटप केले तसेच मिठाई वितरित करून वृद्धाश्रमाच्या वातावरणात गोडवा निर्माण केला.