सरडपार गावाला ग्रामपंचायती चा दर्जा द्या!

42

आठ वर्षांपासून नागरिकांची आर्त हाक 

हिवाळी अधिवेशनात सरडपार गावाचा प्रश्न सोडवावा

नेरी

.         सन 2015 ला चिमूर नगर पंचायतीची निर्मिती झाली. आणि सरडपार गावाला भोग नशिबाचा आला व गाव वाऱ्यावर सुटला सदर गावाला जवळच्या ग्रामपंचायती मध्ये समाविष्ट करा अशी आर्त हाक गावकरी प्रशासनाला घालीत आहेत. मात्र अजूनही याकडे शासनाचे दुर्लक्षच होत असून अख्या महाराष्ट्र राज्यात हे गाव वाऱ्यावर सुटले आहे. अनेक सोयी सुविधा विकास अनेक समस्यांचे माहेर घर सरडपार गाव बनले असून या गावाला कोणीच वाली नाही का ? या हिवाळी अधिवेशनात सरकार लक्ष देईल का आणि स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करील काय ? असे प्रश्न गावकरी उपस्थित करीत असून आतातरी आठ वर्षानंतर सरकारने सरडपार गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा अशी मागणी घालून प्रशासनाला साकडे घालीत आहेत.

.         तालुक्यातील नेरी जवळील सरडपार हे छोटेसे गाव असून सन 1962 पासून काग गटग्रामपंचायती मध्ये समाविष्ट होते. मात्र सन 2015 ला चिमूर नगर पंचायतीची निर्मिती झाली आणि काग हे गाव नगर पंचायत मध्ये सामील झाले तेव्हापासून सरडपार गाव वाऱ्यावर सुटले ,काही कालावधी नंतर ह्या गावाला प्रशासनाने जवळच्या म्हसली ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट केले परंतु प्रशासकीय कारण समोर करीत तेथील नागरिकांनी सरडपार गावाला बाहेर काढले त्यामुळे हे गाव वाऱ्यावर आले अनेकदा प्रशासनाला लोकप्रतिनिधी ना मागण्या केल्या अर्ज दिले निवेदने दिली मेल फक्स केले मात्र अजूनही आठ वर्षे पूर्ण होऊनही कोणीही लक्ष दिले नाही तेव्हा आता विधानसभेचे हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपूर येते सुरू आहे आता तरी या गंभीर वाऱ्यावर सोडलेल्या अनाथ गावाची मागणी पूर्ण करून स्वतंत्र ग्रामपंचायत चा दर्जा द्यावा अशी आर्त मागणी गावकरी करीत आहेत.

.         सरडपार गावात अनेक समस्या असून येथील नागरिक आठ वर्षांपासून निवडणुकीला मुकले आहेत या गावात सरपंच नाही पोलीस पाटील नाही ग्रामसेवक नाही त्यामुळे विकास कामे नाहीत शेतकऱ्यांना शेतात जायला रस्ते नाहीत शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे शाळेतील मुलांना दाखले व इतर कामे करण्यासाठी अडचण गावात आरोग्य सेवा नाही गावात बस सेवा नाही पावसाळ्यात सर्वत्र गवत वापुन नाल्या तुडूंब भरल्या असतात त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे रोगराई ला आमंत्रण मिळत आहे महिला परुष शासकीय योजने पासून वंचित अश्या अनेक समस्यांनी गाव ग्रासले असून हा नशिबाचा फेरा आपल्या मस्तकी आला आहे असे समजून कोणाला दोष द्यायचे असा प्रश्न गावकरी उपस्थित करीत आहेत आणि या गावाला कोणी वाली आहे का असा प्रश्न प्रशासनाला विचारीत असून आता तरी या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत चा दर्जा देऊन या गावाला साडेसातीच्या बाहेर काढावे अशी आर्त हाक प्रशासनाला करीत मागणी करीत आहेत तेव्हा या अधिवेशनात सरकारने या गावाकडे लक्ष देऊन गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी गावकरी करीत आहेत