अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणारे ६ वाहने जप्त 

41

बल्लारपूर महसूल विभागाची धडक कारवाई  :  तीन हायवा व तीन ट्रॅक्टर जप्त

तस्करांचे धाबे दणाणले

 

कोठारी

.         मुरूमाची अवैध वाहतूक करताना तीन हायवा ट्रक उपविभागीय अधिकाऱ्यांनी जप्त केले.तसेच अवैध रेती वाहतूक करतांना तीन ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.दोन दिवसात सहा वाहने जप्त करून महसूल विभाग अवैध उत्खनन करण्यार्याविरुद्ध धडक मोहीम राबविल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

.            मंगळवार दि.६ दिसेम्बरला उपविभागीय अधिकारी डॉ. स्नेहल रहाटे यांना प्राप्त माहिती नुसार विसापुर रोड पेपर मिल च्या मागे मुरुमाचे उत्खनन करून  अवैध वाहतूक होत असल्याचे समजले. त्यांनी लगेच त्या परिसरात पोहचून दोन हायवा ट्रक क्र. एम एच ४० सी डी ०७७७ व एम एच ४० एन ३७२६ सह १२ ब्रॉस मुरूम जप्त केले. अवैध मूरुमाची वाहतूक करणारे ट्रक चंद्रपूर येथील मंगेश रहाटे व प्रशांत चिट्टलवार यांच्या मालकीचे असल्याची माहिती आहे.तसेच बुधवार दि.७ दिसेम्बरला पळसगाव येथून रेतीची अवैध वाहतूक ट्रॅक्टरने होत असल्याची माहिती मंडळ अधिकारी प्रकाश सुर्वे व सुजित चौधरी यांनी माहिती मिळाली असता त्यांनी पळसगावात ट्रॅक्टर क्र.एम एच ३४ ए बी १८४५ शरद बुटले यांच्या मालकीचे वाहन पकडून जप्त केले.ट्रॅक्टर तहसील कार्यालयाकडे आणत असतांना कळमना येथे पेट्रोल पंपाजवळ रेतीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर क्र.नसलेले वाहन जप्त करून कारवाई करण्यात आली.सदर ट्रॅक्टर गुड्डू काळे बल्लारपूर यांच्या मालकीचे असल्याचे समजते.त्यानंतर एम एच ३४ बी एच ९०९८ क्रमांकाचा हायवा ट्रक युगल सुरेंद्र डोहे यांच्या मालकीचा मुरूम वाहतूक करतांना आढळून आला.त्याची चौकशी केल्यानंतर त्यावर कारवाई करून जप्त करण्यात आले.तिन्ही वाहने तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.सहाही वाहनांच्या दंडाची रक्कम १२ लक्ष ५८ हजार८०० रुपये वसूल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

.         तालुक्यात ग्रामीण भागात अवैध मुरूम व रेतीची वाहतूक होत आहे. अश्यातच उपविभागीय अधिकारी डॉ. स्नेहल रहाटे व मंडळ अधिकारी प्रकाश सुर्वे व सुजित चौधरी यांनी तीन हायवा ट्रक तसेच तीन ट्रॅक्टर जप्त केल्याने अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यामध्ये दहशत पसरली आहे.

.         दिवाळीपूर्वी बल्लारपूर महसूल विभागाकडून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाविरुद्ध धडक कारवाई सत्र सुरू केल्याने तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले होते.दिवाळी सुट्ट्याची उसंत संपताच पुन्हा महसूल विभाग अवैध उत्खनन करून वाहतूक करणार्याविरुद्ध धडक कारवाई सुरू करून तालुका प्रशासन एक्टिव्ह मोडवर असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आजपर्यंत अशा प्रकारची कारवाई यापूर्वी कधीही झाली नसून मोकाट सुटलेल्या तस्करांच्या उरात धडकी भरली आहे.गावातील तलाठ्यांना मॅनेज करून तालुक्यात अवैध रेती,मुरूम वाहतूक करण्यात येत होती.मात्र कुणावरही कारवाही करण्याची हिंमत दाखविण्यात आली नाही.