शिवसेना (उ.बा.ठा.) चा कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लि. बरांजच्या विरोधात आंदोलनाचा इशारा

125
  • स्थानिक व प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याची मागणी 

भद्रावती = तालुक्यातील बरांज येथील कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लि. कंपनीत स्थानिक व प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना नोकरीत सामावून घेण्यात यावे. या प्रमुख  मागणी साठी शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने स्थानिक तहसीलदार यांना एक निवेदन सादर करण्यात आले. आठ दिवसात या मागणीवर ठोस निर्णय घ्यावा. अन्यथा संबंधीत कंपनी विरोधात आंदोलन छेडण्यात येईल .असा इशारा देण्यात आला आहे.

शिवसेना ( उ. बा. ठा. ) वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात तालुका प्रमुख नरेंद्र पढाल यांच्या नेतृत्वात सदर निवेदन काल दि. ४ डिसेंबर रोजी स्थानिक तहसीलदार यांना सादर करण्यात आले. याप्रसंगी शहर प्रमुख घनश्याम आस्वले, युवा सेना तालुका प्रमुख राहूल मालेकर,युवा सेना सरचिटणीस येशू आरगी, युवासेना उपतालुका प्रमुख सतिश आत्राम, युवा सेना तालुका चिटणीस अनिरुद्ध वरखडे , अशोक निगम  युवासेना प्रसिद्धीप्रमुख गोपाल सातपूते प्रामुख्याने हजर होते.

स्थानिक व प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना त्वरीत न्याय देण्यासाठी सदर कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासनाने विणाविलंब पावले उचलून उपरोक्त मागणीची पूर्तता येत्या आठ दिवसात करावी अशी मागणी शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने  चंद्रपुर जिल्हा  महीला  आघाडी प्रमुख नर्मदा बोरेकर, कृ. उ. बा.स. सभापती तथा उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजने ,युवतीसेना जिल्हायुवती अधिकारी प्रतिभा मांडवकर , विधानसभा समन्वयक वैभव डहाने ,उपजिल्हा युवासेना अधिकारी  शरद पुरी , वरोरा तालुकाप्रमुख दत्ता बोरेकर, भद्रावती तालुका प्रमुख नरेंद्र पढाल , वरोरा शहरप्रमुख खेमराज कुरेकार ,भद्रावती शहरप्रमुख घनश्याम आस्वले , नंदोरीचे सरपंच तथा वरोरा विधानसभा संघटक मंगेश उर्फ श्रीहरी भोयर,युवासेना तालुकाप्रमुख राहुल मालेकर ,महीला आघाडी उपजिल्हाप्रमुख  माया नारळे ,महीला आघाडी भद्रावती तालुकाप्रमुख तथा युवतीसेना जिल्हा समन्व्यक अश्लेषा जिवतोडे भोयर,महीला आघाडी भद्रावती शहर प्रमुख माया टेकाम ,उपतालुका संघटिका शिला आगलावे ,युवतीसेना उपजिल्हा अधिकारी शिव गुडमल ,भद्रावती तालुका युवती अधिकारी नेहा बनसोड ,भद्रावती शहर समन्वयक भावना खोब्रागडे, माजी नगराध्यक्ष  ज्ञानेश्वर डुकरे, माजी नगरसेवक प्रशांत कारेकर,  माजी सैनिक व विरपत्नी तसेच   वरोरा भद्रावती  क्षेत्रातील समस्त  पदाधिकारी,शिवसैनिक  यांनी संयुक्तपणे  केली आहे.