पवार साहेबांचे विचार घराघरात पोहोचवा: माजी गृहमंत्री अनिल देशमुख.

35

   खोकरी येथे राष्ट्रवादीच्या घर तिथं राष्ट्रवादी अभियानाला सुरुवात   

भद्रावती

.         शरद पवार साहेबांनी आपल्या कारकिर्दीत आजपर्यंत गोरगरिबांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना राबविल्या आहेत. शेतकऱ्यांसाठीही त्यांनी आजवर कल्याणकारी योजना कार्यान्वित केले आहेत. राज्यातील तळागळातल्या व्यक्तीला पवार साहेबांनी नेहमी केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यासाठी कार्य केले आहे. पवार साहेबांचे हे विचार घराघरात पोहोचविण्याचे उद्दिष्ट घेऊन पक्षातर्फे घर तिथे राष्ट्रवादी हे अभियान सुरू केले आहे. पक्षाच्या सर्व पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी या अभियानाद्वारे तालुक्यातील घराघरात शरद पवार साहेबांचे विचार पोहोचवा असे आवाहन राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.

.         राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे भद्रावती तालुक्यातील अतिदुर्गम खोकरी गावातून. अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत पक्षाच्या घर तिथे राष्ट्रवादी अभियानाला सुरुवात करण्यात आली. त्यात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, प्रदेश युवक कार्यअध्यक्ष रविकांत वरपे, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा नागपूर शहर निरीक्षक मुनाज शेख, तालुकाध्यक्ष सुधाकर रोहनकर, एडवोकेट युवराज धानोरकर, प्राध्यापक राजेंद्र ताजणे, शहराध्यक्ष सुनील महाले, राजेश मते, चंद्रशेखर निमजे, संजय आस्वले, फैय्याज शेख, बंडु वनकर, खोकरी सरपंच स्वप्निल पानतावणे, उपसरपंच वांढरे, पुष्पा वांढरे, सुमन कुंमरे, तंटामुक्ती अध्यक्ष मारुती वांढरे, अनिता ढवस, आशा टोंगे, बबन वांढरे, मारुती सरोदे, शेषराव कुमरे, तुकाराम वांठरे, वासुदेव नाकाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

.         यावेळी शरद पवार यांची विचार दर्शविणारे स्टिकर्स गावातील घराघरांच्या प्रवेशद्वारावर गावकऱ्यांतर्फे स्वयंस्फूर्तीने लावून गावकऱ्यांनी या अभियानाला प्रचंड प्रतिसाद दिला. शरद शरद पवार साहेबांच्या विचारांना अंगीकृत करून राष्ट्रवादी पक्षाला साथ देऊन पक्षाच्या ध्येय धोरणाला बळकट करण्याचे आवाहन यावेळी प्रदेश सरचिटणीस मुनाज शेख यांनी गावकऱ्यांना केले. यावेळी अनिल देशमुख यांनी खोकरी गावात फिरून गावकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या येणाऱ्या अधिवेशनात या समस्या शासनासमोर ठेवून त्यांना धारेवर धरू असे आश्वासन त्यांनी यावेळी गावकऱ्यांना दिले. सदर घर तिथे राष्ट्रवादी या अभियानाचे आयोजन तालुकाध्यक्ष सुधाकर रोहनकर यांनी यशस्वीपणे केले. सदर कार्यक्रमाला तालुका तथा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.