आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते चार दिवस मॅरॅथॉन भुमीपूजन व लोकार्पण सोहळा

53

चंद्रपूर

.         वरोरा- भद्रावती मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा बाळु धानोरकर यांनी विकास कामाचा वसा अंगिकारला आहे. भद्रावती तालुक्यात मागील आठवड्यात सर्वाधिक भूमिपूजन व लोकार्पण घेतले. त्याच प्रमाणे आता वरोरा तालुक्यात देखील चार दिवस मॅरॅथॉन भुमीपूजन व लोकार्पण सोहळा घेऊन या भागाच्या विकासाचा नवीन चेहरा निर्माण करण्याचे काम सुरु आहे.

.         शुक्रवारी वरोरा तालुक्यातील विविध विकास कामांचे भुमीपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यात आमदार धानोरकर यांच्यासह वरोरा तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद भोयर, वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती राजेंद्र चिकटे, पंचायत समिती माजी सभापती रवींद्र धोपटे, प्रदीप उरकुडे, दिवाकर निखाडे, विजू आत्राम, शालिक झाडे, डॉ. पठाण, बंडू शेलकी यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

.         यावेळी आमदार धानोरकर यांनी सांगितले की, वरोरा-भद्रावती मतदारसंघातील सर्व गावांमध्ये विकास कामे सुरू आहेत. या विकास कामांसाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याचाच परिणाम म्हणून वरोरा तालुक्यातील 16 गावांमध्ये विविध विकास कामांची सुरुवात झाली आहे.

.         या सोहळ्यात वरोरा तालुक्यातील बोर्डा, जामगाव बु, जामगाव खु, दिदोडा, मेसा, महालगाव बु, धानोली, शेगाव बु, भेंडाळा, चारगाव खु, अकोला नं 2, गिरोला, साखरा, लोधीखेडा, खेमजई आणि परसोडा या गावांमध्ये विविध विकास कामांची सुरुवात करण्यात आली. या कामांमध्ये स्मशानभूमी रस्ता, सिमेंट कॉकीट रस्ता, समाज भवन, ग्रा. पं. भवन, आर.ओ. वॉटर एटीएम मशीन बसविणे, पुलाचे बांधकाम यांचा समावेश आहे. या विकास कामांमुळे वरोरा तालुक्यातील नागरिकांना मोठा लाभ होणार आहे.