सम्राट अशोक चौकात अशोक स्तंभाची उभारणी

33

    डॉ. राजेश कांबळे यांच्या हस्ते लोकार्पण   

ब्रम्हपुरी 

.          स्थानिक सम्राट अशोक चौक येथे बौध्द समाजाच्या वतीने संविधान दिनाच्या निमित्ताने नगरपरिषदेचे उपाध्यक्ष अशोक रामटेके यांच्या प्रयत्नाने नगर परिषदेच्या निधीतून चौकात चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांच्या कार्याची आठवण स्मरणात राहो आणि प्रेरणा मिळावी यासाठी अशोक स्तंभ चौकात उभारण्यात आले.

.          या अशोक स्तंभाचे उदघाटन आणि लोकार्पण सोहळा पार पडला.याप्रसंगी डॉ.राजेश कांबळे माजी समाजकल्याण सभापती यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा रिपब्लिकन पक्ष खोरिपाचे सरचिटणीस जीवन बागडे प्रमुख मार्गदर्शक इंजी. विजय मेश्राम आंबेडकरी विचारवंत तथा कवी, डॉ. चंद्रशेखर बांबोळे, प्रमुख अतिथी म्हणून सुधाकर आभोरे पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन ब्रम्हपुरी, नेताजी मेश्राम संपादक ब्रम्हपुरी ब्लास्ट प्रशांत डांगे,पद्माकर रामटेके यांच्या प्रमुख उपस्थितीत अशोक स्तंभाचे लोकार्पण करण्यात आले. विशेष बाब म्हणजे तालुक्यातील नव्हेच तर आजेबाजूच्या अनेक तालुक्यापैकी फक्त ब्रम्हपुरी येथे सम्राट अशोक चौकात अतिशय देखणा असा अशोक स्तंभ उभारण्यात आला.

.          या कार्यक्रमाचे निमित्याने येत्या दोन तीन दिवसात सेवानिवृत्त होणारे पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांचा तसेच आंबेडकरी चळवळीत मोलाचे योगदान देणारे निष्ठावंत ज्येष्ठ नेते जीवन बागडे यांचा याप्रसंगी बौध्द समाज सम्राट अशोक चौक यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कमलेश चहांदे यांनी केले. तर सूत्रसंचालन नरेश रामटेके यांनी तर उपस्थितांचे आभार डॉ. राहुल चहांदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता विक्रोज पाटील, रोहित कांबळे, मनोज धनविज, रक्षित रामटेके, कार्तिक पाटील, शुभम पाटील, शुभम चहांदे, बंटी मेश्राम, किशोर बनकर, आदर्श रामटेके, विजय पाटील, अशोक मोटघरे, स्वप्नील कुडवे, गुडू रामटेके यांनी परिश्रम घेतले. यावेळेस मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.