वरोऱ्यातील रोटरी उत्सव नागरिकांसाठी जणू आनंदाची‌ पर्वणी : मंगेश खाटीक

36

       रोटरी क्लबच्या वतीने पत्रकारांचा सन्मान       

वरोरा

.           येथील रोटरी क्लबच्या वतीने सहा दिवसीय उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे हा उत्सव म्हणजे वरोरा वासियांसाठी जणू आनंदाची पर्वणीच आहे असे प्रतिपादन व्हाईस ऑफ मीडियाचे विदर्भ विभाग अध्यक्ष मंगेश खाटीक यांनी केले. तालुका क्रीडा संकुलच्या प्रांगणावरील अडीच लाख चौरस फुट जागेवर रोटरी क्लबच्या वतीने सहा दिवसीय उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात रविवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

.           शहरातील तालुका क्रीडा संकुल वर २४ ते २९ नोव्हेंबर दरम्यान रोटरी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात वेगवेगळ्या कंपन्यांची उत्पादने आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ यांचे स्टॉल लावण्यात आले आहे. तसेच लहान मुलांकरिता वेगवेगळी खेळण्याची व मनोरंजनाची साधने या उत्सवात उपलब्ध करून देण्यात आली आहे. रविवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेचे विदर्भ विभाग अध्यक्ष मंगेश खाटीक आणि चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष संजय पडोळे यांनी भेट दिली. याप्रसंगी रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर दादा जयस्वाल, रोटरीचे अध्यक्ष आणि येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ तथा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे सिनेट सदस्य डॉक्टर सागर वझे, सचिव ॲड. मधुकर फुलझेले, समीर बारई, मोनू चिमूरकर, योगेश डोंगरवार, मनोज कोहळे, विनोद नंदुरकर, ओम मांडवकर, दामोदर भासपाले, हिरालाल बघेले, रवी शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते.

.           सदर कार्यक्रमात मंगेश खाटीक, संजय पडोळे, अनिल पाटील, चैतन्य लुतडे, रवी खाडे, अनिल नोकरकार, सारथी ठाकूर, शिरीष उगे या पत्रकारांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. प्रसंगी बोलताना मंगेश खाटीक यांनी रोटरी उत्सवाची प्रशंसा केली. हा उत्सव वरोरा आणि परिसरातील नागरिकांसाठी एक आनंदाची पर्वणी असल्याचे मंगेश खाटीक यावेळी म्हणाले. संजय पडोळे यांनी बोलताना रोटरी उत्सव आणि रोटरी तर्फे दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक मनोज जोगी यांनी केले.