वरोरा तालुक्यातील ग्रामपंचायत खैरगाव बिमा ग्राम पुरस्काराने सन्मानीत.

41

     जिजाऊ ग्राम संघाला 50 हजाराचा पुरस्कार     

वरोरा

.         वरोरा तालुक्यातील खैरगाव येथे भारतीय जीवन विमा निगम शाखा . वरोरा च्या वतीने विमा प्रतिनिधी . शारदा प्रमोद नागापुरे. यांनी सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात जिजाऊ ग्राम संघ खैरगाव अंतर्गत महिला बचत गटातील महिलांचा जीवन विमा काढून 77 पॉलिसी व 5,27,000/- प्रीमियम गोळा केल्यामुळे भारतीय जीवन बीमा निगम शाखा वरोरा कडुन जिजाऊ ग्राम संघ यांना 50 हजार रुपयांचा धनादेश जिजाऊ ग्राम संघाच्या अध्यक्षा . पत्राबाई दडमल. सचिव वृंदा नन्नावरे. व उपाध्यक्ष माला वाघ. यांना सुपूर्त करण्यात आला.

.         या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलित करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  मोहन गोगुलवार यांनी आपल्या जीवनात विमाचे महत्त्व काय आहेत हे ग्रामवासीयांना समजावून सांगितले. शाखा प्रबंधक एलआयसी प्रमुख पाहुणे सचिन उघडे विकास अधिकारी एलआयसी वरोरा यांनी ग्रामवासीयांना विविध योजनांची माहिती दिली. व सौरभ बहादे साहाय्यक एलआयसी वरोरा. ग्रामपंचायत खैर गावचे सरपंच संदिप दडमल यांनी महिला वर्गाला बचत गटाचे महत्व समजावून सांगितले. माजी उपसरपंच रघुनाथ दडमल, ग्रामपंचायत परसोडाचे सदस्य माला दडमल, पोलीस पाटील सुभाष नन्नावरे, माजी पोलीस पाटील विठ्ठल ननावरे, जिजाऊ ग्राम संघाचे पदाधिकारी  पत्राबाई दडमल, वृंदा नन्नावरे, माला वाघ, कल्पना दडमल, सामूहिक सहसाधन महिला प्रतिनिधी खैरगाव या सर्व मान्यवरांच्या हस्ते विमा ग्राम पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

.         या कार्यक्रमात प्रमोद नागापुरे हे गावासाठी सदैव सामाजिक कार्य करत असतात. म्हणून खैरगाव वासियांनी यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रमोद नागपूरे, आभार प्रदर्शन सचिन उघडे यांनी केली. कार्यक्रमाचा यशस्वी करिता रवींद्र बल्की, रवींद्र वाघ, वसंता वाघ, यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.