सिंदेवाह तालुक्यात फटाक्याच्या दुकानात राजकीय दिवाळी

43

    आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्या कडून केली जाते फटाक्याची खरेदी    

सिंदेवाही

.           हिंदू संस्कृतीतील जपणारा आणि पुजनारा महत्वाचा सण म्हणजे दिवाळी. या सणाला पाच दिवस फटाक्याची आतषबाजी करून हा सण साजरा केला जातो. त्यासाठी सिंदेवाही शहरासह गावागावात फटाक्यांची परवाना धारक दुकाने सुरू झाली आहेत. तालुक्यातील पळसगाव ( जाट) येथे दोन राजकीय पक्षाचे दोन दुकाने लागलेली असून काँग्रेसवाले नागरिक काँग्रेस कार्यकर्त्याच्या दुकानातून तर भाजप वाले नागरिक भाजपा कार्यकर्त्याच्या दुकानांमधून फटाके खरेदी करीत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

.           तालुक्यातील पळसगाव ( जाट) हे जवळपास आठ ते नऊ हजार लोकसंख्या असलेले मोठे गाव असून या गावात प्रामुख्याने दोन राजकीय पक्ष कार्यरत आहेत. यामध्ये काँग्रेस आणि भाजपा या दोन राजकीय पक्षामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुका मध्ये राजकीय युद्ध होत असते. या गावातील मतदार हे आपापल्या पक्षाचे कट्टर असून सध्या गावात लागलेल्या फटाक्यांच्या दुकानात काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दुकानांमधून फटाके खरेदी करीत आहेत. तर भाजपा कार्यकर्ते भाजपा कार्यकर्त्यांच्या दुकानांमधून फटाके खरेदी करीत असल्याचे नागरिकांत जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे पळसगाव येथे यापूर्वी एकाच पक्षाचे फटाका दुकान लागायचे. त्यामुळे नागरिकांना कडे कोणताच पर्याय नव्हता. मात्र यावर्षी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुद्धा फटाका विक्रीचे परवाना काढून दुकान लावले असल्याने काँग्रेस चे कार्यकर्ते आपल्याच कार्यकर्त्याच्या दुकानांमधून फटाके खरेदी करीत आहेत. तर भाजपा कार्यकर्ते आपल्याच कार्यकर्त्याच्या दुकानांमधून फटाके खरेदी करीत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.