वासेरा येथे आमचा गाव आमचा विकास उपक्रम

37

           दोन दिवसीय गणस्तरिय प्रशिक्षण           

सिंदेवाही 

.           राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान २०२२- २३ अंतर्गत आमचा गाव,आमचा विकास उपक्रमाअंतर्गत ग्राम पंचायत विकास आरखड्या. संबंधाने पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत ग्राम पंचायत कार्यालय वासेरा येथे दोन दिवसीय गणस्तरिय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी विविध विभागातील कर्मचारी पदाधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले.

.           शासनाच्या आमचं गाव, आमचा विकास या उपक्रमअंतर्गत पाच वर्षाचा गावाचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता. त्या अनुषंगाने २०२४-२५ चा ग्राम पंचायत विकास आराखडा तयार करायचा आहे. सदर आराखडा ग्रामसभेमधून तयार करण्यात येत असून त्याला ग्राम सभेची मंजुरी प्रदान करून घ्यावी लागते. त्या साठी वासेरा येथे दोन दिवसीय गणस्तरिय कार्यशाळा आयोजित करून प्रवीण प्रशिक्षक यांचे मार्फत उपस्थित घटकांना प्रशिक्षण देण्यात आले.

.            यामध्ये सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, शिक्षक, कृषिसहाय्यक, ग्रामपंचायत कर्मचारी, पशुधन पर्यवेक्षक, आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक, सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसंघ अध्यक्षा, सचिव, खजिनदार, ग्राम रोजगार सेवक, इत्यादी घटक यामध्ये अंतर्भूत करण्यात आले. या दोन दिवसीय गणस्तरिय कार्यशाळेला प्रवीण प्रशिक्षक म्हणून प्रिया गुरू यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला वासेरा गणातील वाकल, वानेरी, टेकरी , गडबोरी, सिंगडझरी, गावातील घटका उपस्थित होते.