उमेद नागभीडच्या वतीने दिवाळी फराळ महोत्सव

38

 आकर्षक शोभेच्या वस्तू विक्री व प्रदर्शनी 

नागभीड

.          उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, चंद्रपूर तसेच तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष,पंचायत समिती, नागभीड यांच्या संयुक्त विद्यमाने “दिवाळी सणाच्या खास निमीत्ताने” शासनामार्फत स्वयंसहायता समूहांना व्यवसाय करण्याकरिता प्रवृत्त करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवीण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून दिनांक 06 ते 11 या कालावधीत स्वयंसहायता समूहांनी तयार केलेला दिवाळी फराळ व आकर्षक शोभेच्या वस्तू विक्री व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

.          सोमवार ला या प्रदर्शनीचा उद्घाटनिय सोहळा पार पडला.सदर उद्घाटनिय सोहळ्याचे अध्यक्ष तथा उद्घाटक संवर्ग विकास अधिकारी पं.स.नागभीड च्या प्रणाली खोचरेयांच्या हस्ते तसेच प्रमुख पाहुणे छगन कोलते सरपंच किटाळी,  शाखा व्यवस्थापक CDCC बँक नागभीड चे अशोक तिजारे, सचिव उडान प्रभाग संघ संस्था शारदा बोरकर, अध्यक्ष शशिकला भेंडारकार, सचिव झेप प्रभाग संघ संस्था अनिता बवनकर, अध्यक्ष झेप प्रभाग संघ संस्था अनिता बांबोडे उपस्थित होते.

.          उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी मान्यवरांनी नागभीड वासीय जनतेला सदर दिवाळी फराळ व प्रदर्शनीचा लाभ घेण्यास सांगितले. सदर प्रदर्शनी मध्ये तालुक्यातील स्वयंसहायता समूहातील महिलांनी विविध प्रकारच्या वस्तू विक्रीकरिता आणलेल्या होत्या.

.          सदर च्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहित जनराउत नैताम तालुका अभियान व्यवस्थापक, यांनी तर आमिर पठाण, प्रशांत मडावी, यांनी मार्गदर्शन केले. संचालन ठोंबरे बँक सखी, आभार हांडेकर समूह संसाधन व्यक्ती यांनी केले . शुभम देशमुख, गजानन गोहणे, ज्योती साळवे, दर्शना समर्थ, किशोर मेश्राम, जगदीश हजारे, इंद्रजित टेकाम, शालू खोब्रागडे, स्नेहा वारजूरकर, यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले