Home चंद्रपुर जिल्हा विशेष वरोरा मतदारसंघातील ५९,६६८ मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता !

वरोरा मतदारसंघातील ५९,६६८ मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता !

16

३१ मे पूर्वी मॅपिंग पूर्ण करण्याचे मतदार नोंदणी अधिकारी संदीप भस्के यांचे आवाहन

भद्रावती / वरोरा :  चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघातील एकूण २,८७,४१३ मतदारांपैकी अजूनही ५९,६६८ मतदारांचे २००५ च्या मतदार यादीसोबत मॅपिंग पूर्ण झालेले नाही. विहित मुदतीत हे मॅपिंग पूर्ण न झाल्यास या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाऊ शकतात, अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांनी दिली आहे.

.         भारत निवडणूक आयोगाच्या १४ मे २०२६ च्या आदेशान्वये महाराष्ट्रभर ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (S.I.R.) कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. वरोरा मतदारसंघात आतापर्यंत ८०% मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून, उर्वरित २०% मतदारांचे मॅपिंग अद्याप प्रलंबित आहे. ३१ मे २०२६ पूर्वी आवश्यक पुरावे सादर करून मॅपिंग न केल्यास संबंधित मतदारांची नावे मतदार यादीतून कमी केली जातील.

.       या प्रक्रियेसाठी मतदारांनी आपले नाव तपासण्यासाठी आणि पुढील कारवाईसाठी निवडणूक विभागाने दिलेल्या अधिकृत डिजिटल माध्यमांचा वापर करावा. ज्या मतदारांचे मॅपिंग बाकी आहे, त्यांची मतदान केंद्रनिहाय यादी गुगल ड्राइव्ह लिंक https://drive.google.com/drive/folders/1lod7sGa5t9qREWrsAisXoF9dBS4m3S5J?usp=drive_link किंवा प्रशासनाचा QR Code स्कॅन करून डाउनलोड करता येईल.

.          या यादीत नाव असल्यास मतदारांनी त्यात दिलेल्या मोबाईल क्रमांकावर आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याशी (B.L.O.) त्वरित संपर्क साधणे आवश्यक आहे. मतदारांनी निवडणूक आयोगाच्या (voters.eci.gov.in) या अधिकृत लिंकवर जाऊन २००५ च्या मतदार यादीतील आपला पार्ट नंबर आणि सिरीयल नंबर शोधावा व तो आपल्या बीएलओकडे जमा करावा, जेणेकरून मतदार यादीतील नाव सुरक्षित राहील.

error: Content is protected !!